Healthy Food For Girls esakal
आरोग्य

Healthy Food For Girls : वयाच्या पंचविशीनंतर प्रत्येक मुलीने खावेत हे पदार्थ, कायम राहाल निरोगी

धावपळीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी तुम्हाला आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असते

साक्षी राऊत

Healthy Food For Girls : पंचवीस वर्षाच्या वयात तरुणांमध्ये करियरची धावपळ आणि जबाबदाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. या वयात काही मुली जॉबसाठी धडपडत असतात तर काही मुली मास्टर्स डिग्री घेत असतात. त्यामुळे या काळात त्यांचे आयुष्य अत्यंत धावपळीचे असते.

मात्र धावपळीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी तुम्हाला आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असते. डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. एनर्जेटिक राहण्यासाठी, हार्मोन बॅलेंसिंगसाठी आणि पिरियड्सदरम्यान क्रँप आणि मूड स्विंगपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हेल्दी फूड खावे. चला तर पंचविशीच्या वयात नेमके काय खावे ते जाणून घेऊया.

हेल्दी कार्बोहायड्रेट

कार्बोहायड्रेट उर्जेचा प्राथमिक स्त्रोत असतो. महिलांमध्ये फॅट सेल्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचे वजन झपाट्यान वाढते. जर मुलींनी सुरुवातीपासूनच फिजीकल अॅक्टिव्हिटीज केल्यात तर शरीरातील फॅट झपाट्याने वाढणार नाही. तेव्हा शरीराला एनर्जेटिक बनवण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्ब्सचे सेवन करावे. होल ग्रेन, ओट्स, होल व्हीट पास्ता यांसारख्या पदार्थांमध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात.

हेल्दी फॅट्स

शरीराला हेल्दी फॅट्सचीसुद्धा आवश्यकता असते. अनसॅच्येरेटेड फॅट्सला हेल्दी मानल्या जाते. बदाम, मासे, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल, फिश ऑइल यांमध्ये अनसॅच्येरेटेड फॅट्स असतात. हेल्दी फॅट शरीरात सेरोटोनिन नावाच्या हॅप्पी हार्मोनची लेव्हल वाढते. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहता. हेल्दी फॅटमुळे ब्लड फ्लो सुधारतो. हार्टचे आरोग्यसुद्धा चांगले राहते.

प्रोटीन

प्रोटीन शरीरातील मसल्स वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय प्रोटीन केस आणि नखांच्या वाढीसाठीसुद्धा पोषक आहे. तेव्हा मुलींना प्रोटीनयुक्त पदार्थांचेसुद्धा सेवन करायला हवे. प्रोटीनचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. (Lifestyle)

लोह

मुलींना पिरियड्समुळे लोहाची कमतरता जाणवते. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे. बीट, आवळा, पालक, दाळींब यांसारख्या गोष्टींचे सेवन करा. (Health)

फायबर

फायबरमुळे डायजेशन योग्यप्रकारे होते. अर्ध्यापेक्षा जास्त आजार पचनशक्तीमुळे होतात. अनेक भाज्यांमधून तुम्हाला फायबर मिळते. तेव्हा भाज्या आवर्जून खाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''पंतप्रधान मोदींच्या 'डिग्री'चे तपशील सार्वजनिक करण्याची गरज नाही'', दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai Politics: निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खलबतं! शिंदेसेनेत मोठी इनकमिंग, शरद पवारांसह राज ठाकरेंना धक्का

'अर्थव तुझं राज ठाकरेंनी कौतूक केलेलं, कशाला घाबरतो' व्हिडिओ डिलीट केल्यानंतर असीम सरोदेची पोस्ट, म्हणाले,'कोण काय करतंय ते बघूया.'

Bhoom News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द खरा होणार का? सावंत यांना मंत्रीपदी घेणार का? धाराशिव जिल्ह्यामध्ये चर्चेला ऊत

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाचा रंग शेंदरी का ? जाणून घ्या ही खास आख्यायिका आणि शेंदूरचे पूजेतील महत्त्व

SCROLL FOR NEXT