Winter Sakal
आरोग्य

Healthy Food For Winter : पाच लाडवांचे प्रकार हिवाळ्यात ठेवतील निरोगी

हिवाळ्यात शरिराची हालचाल कमी होते. यामुळे संधिवाताची समस्या उद्भवू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Healthy Food For Winter : हिवाळ्यात वातावरण बदलामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात हवेची आद्रता कमी असते तसेच शरीराला पोषक घटकांची गरज असते. हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहार अत्यंत आवश्यक असतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील आजारांपासून बचावासाठी कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त लाडू सांगणार आहोत.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हिवाळ्यात शरीरातील रक्ताभिसरण कमी प्रमाणात होते. तसेच शरिराची हालचालही कमी होते. यामुळे संधिवाताची समस्या उद्भवू शकते. आज वयस्कर व्यक्तींसोबत तरूणांनादेखील पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे.

हे पाच लाडू ठेवतील निरोगी

1. सुंठाचे लाडू

सुंठाचे लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत. सुंठाची कोरडी पावडर घेऊन त्याने लाडू करता येतात. आल्यामध्ये जिंजरॉल असत जे एक बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे. सांधेदुखी दूर व्हावी म्हणून हे फायदेशीर आहेत.

2. जवसाचे लाडू

जवसाचे लाडू महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. फ्लॅक्ससीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि ओमेगा -3 असतात. त्यामुळे हाडांना खूप फायदे होतात आणि त्यातलं फायबर पोटासाठीही फायदेशीर असतं.

3. तिळाचे लाडू

लोकांना हिवाळ्यात तिळाचे लाडू खायला आवडतात. तीळ शरीरात उष्णता निर्माण करते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. यातील कॅल्शियम हाड मजबूत करत, तर अँटिऑक्सिडंट्स शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करते.

4. ड्रायफ्रूट्सचे लाडू

अनेकांना ड्रायफ्रुट्सचे लाडू आवडतात. या लाडवांच्या सेवनामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. ड्रायफ्रुट्सच्या लाडवांमध्ये विविध प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्व असतात जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात.

5. नाचणीचे लाडू

नाचणीचे लाडू सगळ्यांनाच आवडतात असं नाही; पण याच्या सेवनाने शरीराला खूप फायदे होतात. नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरात उष्णता तयार करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT