Healthy Food esakalc
आरोग्य

Healthy Food : हिवाळ्यात आजारी पडण्यापासून वाचवेल गुळाची चिक्की, घरी बनवायलाही आहे सोप्पी

हिवाळ्यात गुळाचे सेवन हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करते

Pooja Karande-Kadam

Healthy Food :

हिवाळ्यात उष्ण स्वभावाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कारण ते शरीरात उष्णता टिकवून ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. गुळापासून बनवलेल्या गोष्टी हिवाळ्यात खूप खाल्ल्या जातात. जसे गुळाचे लाडू, गुळाची खीर, शिरा किंवा गुळाची चिक्की.

हिवाळ्यात गुळाची चिक्कीही भरपूर खाल्ली जाते. शेंगदाणे आणि गूळ यांच्या मिश्रणातून तयार केलेला हा पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया गुळाच्या चिक्कीचे फायदे आणि ती कशी बनवायची हे पाहुयात.

गुळाची चिक्की खाण्याचे फायदे

पचनासाठी फायदेशीर

हिवाळ्यात पचनाच्या समस्या अधिक होतात. गूळ आणि शेंगदाणे दोन्ही पचन सुधारण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत गुळाची चिक्की खाणे फायदेशीर ठरू शकते. जेवणानंतर किंवा स्नॅकच्या वेळी तुम्ही गुळाच्या चिक्कीचा आस्वाद घेऊ शकता.

वजन कमी करण्यास मदत करते

गुळाच्या चिक्कीत कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही पुढील जेवणात कमी कॅलरी वापरता. तुम्ही तुमच्या स्नॅकच्या वेळेत याचा आनंद घेऊ शकता, ते तुमच्या अन्नाची लालसा नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

प्रतिकारशक्ती मजबूत ठेवा

गुळाची चिक्की खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. गूळ आणि शेंगदाणे हे दोन्ही पदार्थ उष्ण असतात. तसेच, शेंगदाण्यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला वारंवार आजारी पडण्याचा धोका नाही.

शरीराला डिटॉक्सिफाइड करते

गुळातील आवश्यक पोषक तत्व शरीराला डिटॉक्स करण्यास आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. हे हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यास आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे रक्त डिटॉक्स करण्यासाठी गुळाची चिक्की हा एक चांगला पर्याय आहे.

अशा प्रकारे हिवाळ्यात गुळाची चिक्की तुमच्यासाठी पॉवर पॅक ठरू शकते. आता गुळाची चिक्की कशी बनवायची ते जाणून घेऊया.

गुळाच्या चिक्कीची रेसिपी

साहित्य

  • शेंगदाणे - 3 कप

  • देशी तूप- गरजेनुसार

  • गूळ - 200 ग्रॅम

  • पाणी - गरजेनुसार

  • वेलची- ७-८

कृती

  1. सर्वप्रथम शेंगदाणे सोलून तुपात भाजून घ्या. जास्त भाजू नका,हे लक्षात ठेवा, नाहीतर चिक्की कडू होईल.

  2. आता कढईत गूळ वितळवून पाक तयार करा. त्यात थोडे गरम पाणी टाकत राहा म्हणजे पाक चिकटणार नाही.

  3. आता त्यात शेंगदाणे टाका आणि मिश्रण चांगले तयार करा. त्यात वेलचीही घाला.

  4. आता एका प्लेटमध्ये थंड करून त्याचे आकार कापून चिक्की तयार करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT