Healthy Pregnancy Tips
Healthy Pregnancy Tips  esakal
आरोग्य

Healthy Pregnancy Tips : गर्भपातानंतर पुन्हा चान्स घेताना भिती वाटते? पहा काय काळजी घ्यावी!

सकाळ डिजिटल टीम

नवं लग्न झाल्यावर दोन तीन महिन्यात गोड बातमी मागणारे लोक प्रत्येक कुटुंबात असतात. त्यामुळे पुरेसे नक्की नसताना काहीवेळा जोडपी बाळाचा विचार करतात आणि योग्य ती काळजी घेत नाहीत. त्यामूळे काहीवेळा नववधूला गर्भपाताचा सामना करावा लागतो.

आई बनणं हा एक सुखद अनुभव आहे पण आई बनण्याच्या मार्गातील या ९ महिन्यांच्या प्रवासात गर्भवती महिलांच्या मनात बाळाविषयी अनेक संभ्रम असतात. ज्यामध्ये सर्वात साधारण असते ती म्हणजे गर्भपाताची भीती! प्रेग्नेंसीच्या २० व्या आठवड्याआधीच बाळाचा मृत्यु होणं यालाच गर्भपात म्हणजेच म्हणतात. 

अनेक केसेसमध्ये महिलांची शारिरीक आणि मानसिक स्थिती योग्य आहे का हे न तपासल्याने गर्भपाताचा सामना करावा लागतो. अनेकवेळा महिलांना लग्नानंतर पहिल्याच महिन्यात गर्भधारणा होते पण नंतर गर्भपाताला सामोरे जावे लागते. गर्भपात झाल्यानंतर दुसरा चान्स घेणे आणि तेव्हाही जर गर्भपात झाला तर काय काळजी घ्यावी. पहिल्या गर्भपातानंतर काय काळजी घ्यावी, याबद्दल आज जाणून घेऊयात.

भिती काढून टाका

बहुतेक स्त्रियांना गर्भपात झाल्यानंतर पुन्हा गर्भधारणेची भीती वाटते. त्यांना वाटू लागते की त्यांची आई बनण्याची इच्छा त्यांच्या आयुष्यासाठी मोठा धोका बनू शकते. मी पुन्हा गर्भधारणा करू शकते का?,मला कोणता आजार आहे का?, वंध्यत्व उपचाराची गरज आहे का?, हे असे काही प्रश्न आहेत जे प्रत्येक स्त्रीच्या मनात कधी ना कधी गर्भपात झाला आहे.

एका सर्व्हेनुसार

जगातल्या २० टक्के प्रकरणांमध्ये प्रत्येक महिलेचा गर्भपात होण्याची शक्यता असते. पण ते सातत्याने होणारे गर्भपातात येत नाही. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत होणारे ५० टक्के गर्भपात हे गुणसूत्रांच्या असामान्यतेमुळे होतात. जोडीदारांमध्ये दोघांनाही मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गुणसूत्रातील असामान्यता असेल तर वारंवार गर्भपात होण्याची शक्यता असते.

काय काळजी घ्यावी

- गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत गर्भपात झाल्यास लगेचच पुढील गर्भधारणा होऊ शकते. परंतु गर्भपातानंतर किमान दोन महिने लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला दिला जातो.

- गर्भपातानंतर पुढील गर्भधारणेचे नियोजन करण्याची घाई करू नका. मासिक पाळी नियमीत होईपर्यंत किमान 3 महिने प्रतीक्षा करा.

- निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. निरोगी गर्भधारणेसाठी चांगली दिनचर्या आणि जीवनशैली पाळणे खूप महत्वाचे आहे.

- संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये कडधान्ये, पालेभाज्या, फळे आणि लोहयुक्त अन्न यांचा समावेश होतो, ज्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता दूर होते.

- तुम्हाला मधुमेह असल्यास, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा आणि दुसऱ्या गर्भधारणेपूर्वी नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो. कारण मधुमेहामुळे जन्म दोष आणि गर्भपात यासारखे वाईट परिणाम होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT