Heart Attack sakal
आरोग्य

Heart Attack : अचानक हार्ट अटॅक आला तर फक्त 'या' 3 स्‍टेपनी वाचवा जीव

अशात सीपीआर (CPR) म्हणजेच कार्डियोपल्‍मोनरी रेससाइटेशन देऊन रुग्णांना हॉस्पिटलला जाण्यापूर्वीच धोक्यातून बाहेर काढू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Heart Attack : हिवाळ्याच हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक वाढले आहे. हार्ट अटॅक जरी अचानक येत असला तरी शरीर त्यापूर्वी काही संकेत देत असते. कोरोना काळानंतर तर हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. अशात हार्ट अटॅक न येण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Heart Attack first aid how to do CPR read story)

हार्ट अटॅक जरी अचानक आला तरी रुग्णाचा मृत्यू त्वरीत होत नसतो. जर त्या दरम्यान सुरवातीला फर्स्ट एडची मेडीकल सुविधा मिळाली तर रुग्णाची जीव वाचवू शकतो पण अनेकदा कोणत्याही मेडिकल केअर किंवा हॉस्पिटलपर्यंत पोहचण्यासाठी उशीर होतो आणि त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

अशात सीपीआर (CPR) म्हणजेच कार्डियोपल्‍मोनरी रेससाइटेशन देऊन रुग्णांना हॉस्पिटलला जाण्यापूर्वीच धोक्यातून बाहेर काढू शकतो. हार्ट अटॅक प्रकरणात हे एक फर्स्ट एड आहे. चला तर CPR कसा कराचया याविषयी जाणून घेऊया.

१. ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असतो. त्याचे हार्ट बीटसुद्धा कमी होऊन जातात अशात त्या व्यक्तीला त्वरीत पाठीच्या भागावर झोपवा.

2. आपल्या एका हातावर दुसरा हात ठेवा आणि हे दोन्ही हात रुग्णाच्या छातीवर मधोमधी ठेवून दाब देण्याचा प्रयत्न करा आणि एका एका मिनिटामध्ये कमीत कमी 100 वेळा दाब द्या.

3. जेव्हा तुम्ही दाब देता छातीला सामान्य स्थितीत येऊ द्या. अस तेव्हा पर्यंत करा जोपर्यंत रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहचत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT