Why you shouldn’t hold in gas if you have high BP Sakal
आरोग्य

Farting Benefits: गॅस सोडताना लाज वाटतेय? आता नाही वाटणार, कारण बीपी कमी होण्याशी आहे याचा थेट संबंध!

Can Farting Really Reduce Blood Pressure Naturally: गॅस सोडल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

Anushka Tapshalkar

Farting and Blood Pressure Connection: गॅस सोडणं ही एक अगदीच नैसर्गिक क्रिया आहे. पण तरीही अनेकांना त्याबद्दल लाज किंवा संकोच वाटतो. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जर गॅस बाहेर गेला, तर अनेकजण नाकं मुरडतात, हसतात किंवा त्या व्यक्तीकडे विचित्र नजरेने पाहतात. बऱ्याचदा ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगुन पोटात हा गॅस तयार होतो.

पण तुम्हाला माहित आहे का, हीच क्रिया तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते? विशेषतः ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

अलीकडील संशोधनातून एक आश्चर्यजनक बाब समोर आली आहे ती म्हणदे गॅस सोडल्याने उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होऊ शकते. हे ऐकून आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण विज्ञानाच्या आधारे केलेला अभ्यास याचा आधार बनतो.

गॅस आणि रक्तदाब यांचा काय संबंध?

आपण गॅस बाहेर काढतो ते दोन प्रकारे. एक म्हणजे ढेकर स्वरूपात आणि दुसरे म्हणजे गॅस मार्फत. बहुतेक लोक गॅस गेल्यावर संकोचतात, पण जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, गॅस बाहेर टाकल्यामुळे शरीरात तयार होणारा एक विशिष्ट वायू, हायड्रोजन सल्फाइड (H₂S), रक्तदाब कमी करण्यात उपयोगी ठरतो.

हायड्रोजन सल्फाइडची भूमिका

हा वायू आपल्या पोटात अन्न पचत असताना, खासकरून सल्फर असलेले पदार्थ खाल्ल्यावर तयार होतो. त्यामुळे धमण्यांना फुगवण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी मदत होते. पण याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो आणि रक्तदाब घटतो. त्यामुळे शरीरात गॅस साचून राहण्यापेक्षा तो बाहेर जाणे आरोग्यच्या दृष्ट्यीने फायदेशीर ठरते.

गॅस रोखल्याने काय त्रास होतो?

जर तुम्ही सतत गॅस रोखत असाल, तर त्यामुळे पोटात दुखणे, गॅसेसने पोट फुगणे, पोटात कळा येणे अशा तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे गॅस बाहेर जाणे महत्त्वाचे आहे.

पण जर तुम्हाला वारंवार गॅस होण्याची समस्या भासत असेल, तर आहारात योग्य बदल करा. फायबरयुक्त अन्न, दही, पाण्याचे सेवन आणि संतुलित जीवनशैली यामुळे गट हेल्थ सुधारते.

नोट

यासंबंधीचा अभ्यास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पण रस्ता नाही, ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यानं नदीत उडी मारली, अजून शोध सुरू

iPhone failure signs: आयफोन बिघडण्यापूर्वी दिसणारे 'हे' लक्षण, नका करू दुर्लक्ष

Thane Dahi Handi 2025 : जिथं जय जवान पथक कोसळलं, तिथंच कोकण नगर पथकानं रचला 10 थरांचा इतिहास; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनीही केलं कौतुक

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने होम लोन केले महाग

तुला कसा नवरा हवाय? रिंकू राजगुरूने दिलेल्या उत्तरावर प्रार्थना बेहेरेने दिला सल्ला; म्हणते- तेव्हाच लग्न कर जेव्हा तू...

SCROLL FOR NEXT