Homeopathy sakal
आरोग्य

होमिओपॅथी कशी काम करते?

एमबीबीएस केल्यानंतर माझा होमिओपथी या वैद्यकीय विज्ञानाच्या अभ्यासाचा योग आला, तेव्हा सुरुवातीला मला ही कार्यप्रणाली समजायला खूप अवघड गेली.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

एमबीबीएस केल्यानंतर माझा होमिओपथी या वैद्यकीय विज्ञानाच्या अभ्यासाचा योग आला, तेव्हा सुरुवातीला मला ही कार्यप्रणाली समजायला खूप अवघड गेली. अनेकदा वाचन केल्यानंतर, काही सीनियर वैद्यांकडून धडे घेतल्यानंतर मला होमिओपॅथी हे शास्त्र नेमकं काय आहे हे समजू लागलं आणि त्यामधील माझा इंटरेस्ट आणि समज वाढू लागली.

अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले, तर आपल्याला कोणतीही जखम झाली, की काही काळाने आपोआप रक्तस्राव थांबतो, त्यावर खपली येऊ लागते आणि बघता बघता काही आठवड्यांमध्ये ती जखम पूर्ण भरून निघते. ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे, यामध्ये आपण बाहेरून कोणतेही औषधोपचार किंवा प्रक्रिया यांची गरज नसते. हे सगळे कोण करते आणि आपोआप क्रमशः हे बदल कसे घडतात? याचे उत्तर आहे निसर्गातील सर्व जीवांची बरे होण्याची ताकद म्हणजेच ‘नॅचरल हीलिंग फोर्स’.

हाच फोर्स एक जीव म्हणून आपण आईच्या पोटात असल्यापासून आपल्या आत निरनिराळ्या तणावांविरोधात स्वतःचे रक्षण करण्यासाठी एक जिवंत ऊर्जाशक्तीच्या रूपात कार्यरत असतो, ज्याला होमिओपॅथीमध्ये ‘vital force’ (जीवनचैतन्य) म्हटले आहे. आपली शारीरिक, मानसिक, भावनिक वाढ चांगली व्हावी, कोणत्याही आंतरिक किंवा बाहेरून आलेल्या ताणसोबत लढून आपण सर्वोत्तम स्थितीत राहावे यासाठी हे जीवनचैतन्य तिन्ही (शारीरिक, भावनिक, मानसिक) स्तरांवर प्रयत्नशील असते.

अनेकदा चुकीच्या जीवनशैलीमुळे, आनुवंशिकतेमुळे, सामाजिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक तणावामुळे हे जीवनचैतन्य कमजोर होते आणि याचे परिणाम म्हणून शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावर निरनिराळी लक्षणे, आजार दिसून येतात. उदाहरणार्थ, हळवा स्वभाव असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक सर्वांसमोर ओरडले, मित्र त्यावर हसले, तर त्याला मानसिक स्तरावर त्रास होईल, घरी येऊन कदाचित तो अचानक आजारी पडेल, ताप येईल किंवा उलट्या होतील इत्यादी.

सर्वच विद्यार्थी शिक्षकांच्या ओरडण्याबाबत इतके संवेदनशील नसतील, कारण त्यांचे जीवनचैतन्य हे त्या बाबतीत कमजोर नाही, ओरडा बसला, तरी, त्यांना त्याचा गंभीर त्रास होणार नाही.

आपण बहुतांश वेळा लक्षणांवर औषध देतो; परंतु होमिओपॅथीची औषधे ही त्या व्यक्तीच्या स्वभाव-प्रकृतीनुसार आणि तणावपूर्ण घटनेनुसार कमजोर झालेल्या जीवनचैतन्याची स्थिती ओळखून त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी दिली जातात. म्हणजे केवळ लक्षणांवर नाही, तर आजाराच्या मुळाशी जाऊन काम करण्याची क्षमता होमिओपॅथीच्या औषधांमध्ये असते.

अचूक औषध दिले गेले, तर पुढच्या वेळी शिक्षकांचा ओरड खाण्याची वेळ त्या विद्यार्थ्यावर परत आली, तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्याचा सामना करू शकेल. हे जीवनचैतन्य म्हणजे दुसरे काहीही नसून योग व आयुर्वेदातील प्राणमय कोष म्हणजे एनर्जी बॉडी (ऊर्जा शरीर ) आहे आणि या सूक्ष्म ऊर्जास्तरावर झालेले बिघाड आजाराच्या रूपात आपल्याला दिसून येतात आणि हे बिघाड ठीक केले, तर शरीरातील आजारही आपोआप कमी झालेले दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT