Benefits Of Gomukhasana  esakal
आरोग्य

Benefits Of Gomukhasana : उत्तम स्ट्रेचिंगसाठी आणि तणाव मुक्तीसाठी दररोज करा गोमुखासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits Of Gomukhasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे फार गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Gomukhasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे फार गरजेचे आहे. उत्तम फिटनेस राखण्यासाठी तुम्ही व्यायामासोबतच योगाची देखील मदत घेऊ शकता. मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी दररोज योगासनांचा सराव करणे लाभदायी आहे. योगा केल्याने शरीराचे योग्य पोषण आणि टोनिंग होण्यास मदत होते.

योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो. या आसनांपैकीच एक असलेले गोमुखासन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज या योगासनाचा सराव केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. आज आपण हे गोमुखासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

गोमुखासन योगासन करण्याची योग्य पद्धत

योगासनांमध्ये विविध आसनांचा समावेश असतो. या आसनांपैकी कोणतेही आसन करताना ते योग्य पद्धतीने करणे महत्वाचे असते. गोमुखासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पायांमध्ये क्रॉस करून किंवा पाय दुमडून बसा. त्यानंतर, तुमचा उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.

त्यानंतर, तुमचा उजवा हात खांद्याच्या वर ठेवा आणि हातांचा कोपर शक्य तितक्या पाठीमागे न्या. आता डाव्या हाताचा कोपर मागे आणून दोन्ही हात जोडा. काही वेळ या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. आता दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

गोमुखासन करण्याचे फायदे

  • योगा तज्ज्ञांच्या मते गोमुखासन नियमित केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • सायटिकाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे.

  • या योगासनाचा नियमित सराव केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या दूर केली जाऊ शकते.

  • खांदेदुखी आणि मानेच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे.

  • पाठीचा कणा बळकट करण्यासाठी आणि शरीराच्या उत्तम टोनिंगसाठी गोमुखासनाचा दररोज सराव करणे फायद्याचे मानले जाते.

  • चिंता, तणाव आणि नैराश्यापासून आराम मिळवण्यासाठी गोमुखासन फायदेशीर योगासन आहे.

  • गोमुखासनाचा दररोज सराव केल्याने संपूर्ण शरीरातील स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

Latest Marathi News Live Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई, भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

SCROLL FOR NEXT