how to do Parivarta Utkatasana yoga benefit health Revolved Chair Pose sakal
आरोग्य

Parivarta Utkatasana : परिवर्त उत्कटासन

हे दंडस्थितीमधील आसन आहे. हे आसन सोपे दिसले, तरी त्या स्थितीमध्ये स्थिर राहिल्यानंतर त्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.

मनाली देव

हे दंडस्थितीमधील आसन आहे. हे आसन सोपे दिसले, तरी त्या स्थितीमध्ये स्थिर राहिल्यानंतर त्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.

असे करावे आसन

  • प्रथम ताठ उभे राहावे. दोन्ही पायात साधारण खांद्याएवढे अंतर घ्यावे.

  • आता गुडघे वाकवून उत्कटासनमध्ये यावे. म्हणजेच दोन्ही गुडघे वाकवून दोन्ही मांडी व पोटरी यामध्ये काटकोन होईल, मांडी जमिनीला समांतर ठेवावी.

  • दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्यावे. श्वसन संथ सुरू ठेवावे.

  • आता उत्कटासनमधून परिवर्त उत्कटासनामध्ये जाताना कंबरेतून डाव्या बाजूला प्रथम वळावे.

  • त्यानंतर उजव्या हाताच्या दंडाने व कोपराने डाव्या मांडीला रेटा द्यावा. मानसुद्धा डाव्या बाजूला वळवावी.

  • छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा.

  • गुडघे वाकविल्यावर बोटांच्या पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

  • शक्‍य तेवढा वेळ आसनस्थितीमध्ये स्थिर राहावे. श्‍वास संथ सुरू ठेवावा. नजर स्थिर ठेवावी.

  • आसन सोडले की दुसऱ्या बाजूनेही करावे.

आसनाचे फायदे

  • या आसनाच्या नियमित सरावाने पायाच्या स्नायूंची ताकद वाढते.

  • पायातील विशेषतः मांडीची शक्ती वाढते. पायदुखी कमी होऊ लागते.

  • मांडीची पोटावरची कंबरेतील अतिरिक्त चरबी कमी होते.

  • पोटाला पीळ बसल्याने पचन व संस्थेचे कार्य सुधारते.

  • गॅसेस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन हे त्रास कमी होतात. मधुमेह, पाठदुखी, कंबरदुखीवर उपयुक्त.

  • मुलांना एकाग्रता वाढण्यास, चिडचिड कमी होण्यास उपयोगी.

  • गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आसन करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT