Setubandha Sarvangasana sakal
आरोग्य

Setubandha Sarvangasana: सेतुबंध सर्वांगासन करण्याची सोपी पद्धत कोणती? जाणून घ्या हे आसन करण्याचे फायदे

Why Should You Practice Setubandhasana Daily: सेतुबंध सर्वांगासन कसं करावं आणि त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते, हे जाणून घ्या सोप्या भाषेत.

सकाळ वृत्तसेवा

How To Do Setubandh Sarvangasana: हे शयन स्थितीमधील आसन आहे, सर्वांगासनचा व सेतुबंधासन एकचा व्यवस्थित सराव झाल्यानंतर या आसनाचा सराव सुरू करावा.

असे करावे आसन

- प्रथम पाठीवर झोपावे. प्रथम सर्वांगासनच्या स्थितीमध्ये यावे.

- त्यानंतर हळूहळू एक-एक पाय जमिनीच्या दिशेला घ्यावा. पाय खाली घेताना झटका बसणार नाही याची काळजी घ्यावी.

- पाय खाली घेताना सर्वांगासनातील हाताची पकड थोडी बदलावी म्हणजेच हाताचा अंगठा पाठीकडे व चार बोटे पोटाच्या दिशेला या प्रमाणे कमरेला किंवा पाठीला आधार द्यावा.

- दोन्ही तळपाय जमिनीला टेकवायचा प्रयत्न करावा, डोक्याच्या मागची बाजू, खांदे व कोपरे जमिनीला टेकलेले असावेत.

- छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्र करावा. हे आसन करताना हनुवटी छातीच्या दिशेला चिकटलेली असावी.

- जेवढा वेळ आसनस्थितीमध्ये स्थिर राहणे शक्य आहे, तेवढा वेळ स्थिर राहावे. श्वसन संथ सुरू ठेवावे.

- आसन सोडताना हळूहळू उलट क्रमाने सोडावे किंवा हाताचा आधार काढून दोन्ही हाताचे तळवे खाली जमिनीवर टेकवावे व पाय गुडघ्यात वाकवून हळूहळू कंबर व पाठ जमिनीला टेकवावी.

लाभ

या स्थितीत छातीचे, पोटाचे व मांडीचे स्नायू ताणले जातात. ज्यांना थायरॉइडचा, अस्थमाचा त्रास आहे, पचनाशी संबंधित तक्रारी, कंबरदुखी, पाठदुखी आहे, त्यांनी या आसनाचा सराव नियमित करावा.

काळजी

मानेचे, पाठीचे दुखणे, व्हर्टिगो असलेल्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली या आसनाचा सराव करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT