आरोग्य

Covid Test At Home : फक्त २५० रुपयांमध्ये अवघ्या १५ मिनिटांत करा रॅपीड टेस्ट?

सकाळ डिजिटल टीम

  • आयसीएमआरने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट कीटला मंजुरी दिली होती.

  • टेस्ट कार्डवर Cआणि T दोन्ही लाईन आल्यास कोरोना संक्रमित आहात

  • घरबसल्या २५० रुपयांमध्ये कोविड १९ टेस्ट करा. १५ मिनिटांमध्ये मिळवा रिझल्ट

Covid 19 Rapid Rest Kit Home Use : भारतामध्ये (India) कोरोनाच्या(Corona) तिसरी लाट वेगात पसरत आहे आणि दिवसेंदिवस तिचा वेग वाढत आहे. अशावेळी घरबसल्या २५० रुपयांमध्ये १५ मिनिटमध्ये कोरोनाची चाचणी करू शकता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट (Covid-19 Rapid Antigen Test) कीटला मंजूरी दिली होती. लक्षण दिसल्यावर तुम्ही घरबसल्या उशीर न करता कोरोना झालाय की नाही याची तपासणी करू शकता. पण हे टेस्ट कीट कोरोना व्हायरसच्या व्हेरिअंटची माहिती देऊ शकतो की नाही यावर संशोधन सुरू आहे. अशामध्ये तुम्ही घरबसल्या कशा प्रकारे होम टेस्टिंग करण्याचा योग्य प्रकार सांगा. (How to Perform Covid-19 Rapid Antigen Test at Home and What to Avoid )

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने कोरोना संक्रमित रुग्नांसोबत संपर्कात आलेल्यांना रॅपीडअ‍ॅन्टीजने टेस्टमार्फत घरबसल्या कोरोनाची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. आईसीएमआर द्वारा अ‍ॅडवाईजरीनुसार जर गंभीर लक्षण दिसत असूनही रॅपीड टेस्ट निगेटिव्ह होते तेव्हा सेंटरवर जाऊन कोरोनाची चाचणी करू शकता.ग्लोज

कशी करतात रॅपीड टेस्ट? Rapid Test Kit Covid-19 How Does It Work?

  • कोविड-19 किट वापरताना सर्वात आधी साफ सफाई करून घ्या.

  • हाताला साबण लावून धूतल्यांनतर व्यवस्थित सुकवा आणि ग्लोज वापरा.

  • आता किटचा पाऊच फोडून सामन एका टेबलावर काढून घ्या.

  • लक्षात घ्या, टेस्टिंग किटचा वापर करताना आधी कीटवर दिलेले MY Lab Viscose अ‍ॅप डाऊनलोड करून लॉग ईन करा.

  • किटमध्ये आधीच भरलेली एक्सट्रेक्शन टयुब घ्या. त्यामधील द्रव पदार्थ खाली यावा साठी टेबलावर ठेवून खालच्या बाजूला दाबा.

  • आता कॅप उघडा आणि ट्युबला आपल्या हातांनी पकडा.

  • ट्यूबला हातामध्ये पकडून स्टेराईल नेजस स्वॅब खोला आणि आपल्या दोन्ही नाकपूड्यांमध्ये एका पाठोपाठू ३-४ सेमी पर्यंत आत टाकून नेजल स्वॅब टाकून ५ वेळा फिरवा.

  • त्यानंतर स्वॅबला एक्सट्रॅक्शन ट्यूबमध्ये १० वेळा फिरवा. लक्षात ठेवा की या काळात स्वॅब लिक्विडमध्ये बुडलेला असला पाहिजे.

  • स्वॅब तोडून शेवटी ट्यूब नोजल कॅपने सील करा,

  • टेस्ट कार्डवर ट्यूब दाबून २ ते ३ थेंब टाका आणि साधारण १५ ते २० मिनिट वाट पाहा.

  • असे केल्यामध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याची माहिती मिळते.

आयसीएमआरा द्वारा अ‍ॅपवर १५ मिनिटांचा अलार्म सेट करा. अलार्म वाजल्यानंतर तुम्ही रिपोर्ट बघू शकता. जर टेस्ट कार्डवर सी आणि टी दोन्ही लाईन दिसतात त्याचा अर्थ तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. पण टेस्ट कार्ड पण फक्त सी लाईन दिसत असेल तर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आहे. तेच फक्त टी लाईन कार्डव दिसत असेल किंवा कोणतीच लाईन दिसत नसेल तर टेस्ट नीट झाली नाही असे समजा. तसेच रिपोर्ट आल्यानंतर टेस्ट कार्ड फोटो अ‍ॅप वर अपलोड करा.

टेस्ट करताना या चूका करू नका

ज्या लोकांनी कधी घरी कोविड-19चे परिक्षण केले नाही, त्यांनी तुम्ही परिक्षण पाऊचवर अंकित मार्गदर्शक सुचना व्यवस्थित वाचले आहे की नाही याची खात्री करा. पण, काळजी घ्या की स्वॅबला एक्सट्रक्शन ट्युबमध्ये बुडवून ठेवायला हवे. तसेच टेस्ट करताना स्वच्छता प्रोटोकॉलचे पालन करा. साफ सफाई करू झाल्यावर परिणाम वाईट होऊ शकतात. त्यामुळे टेस्ट करताना आपले हाथ व्यवस्थित साबण लावून धूवा आणि सुकवा.

रॅपीड अॅन्टीजन किंवा आरटीपीसीआर कोणती चांगली आहे. (rapid test kit covid 19 vs RT PCR test

रिवर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमियर्स टेन रिअॅक्शन म्हणजे आरटीपीसीआर टेस्ट लॅबमध्ये केले जाते. त्यामुळे टेस्ट द्वारे शरीरामध्ये व्हायरस आहे की नाही समजते. त्यामुळे यामध्ये व्हायरस आएनएची तपासणी केली जाते. जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल याला जास्त विश्वसनीय मानते. तेच रॅपीड अॅन्टीजन टेस्ट तुम्ही घरबसल्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत जाणून घेऊ शकता कोरोना लक्षण असूनही जर एखाद्या व्यक्तीची टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तो फायनल न मानता आरटीपीसाआर चाचणी करून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT