high BP  google
आरोग्य

कुटुंबात कोणालाही उच्च रक्तदाब असल्यास राहा सावध ! तुमच्यावर असा होऊ शकतो परिणाम

तुमच्या घराण्यात कोणालाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्हीही या आजाराचे बळी ठरू शकता. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटले जाते; कारण या आजाराची फारशी लक्षणे नसतात. डोकेदुखी, डोके जड होणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके अचानक वाढणे अशी काही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. यावर वेळेत नियंत्रण मिळवले नाही तर भविष्यात हृदयविकार होऊ शकतो.

तुमच्या घराण्यात कोणालाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्हीही या आजाराचे बळी ठरू शकता. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

मीठ कमी खावे

मिठामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो. मिठामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहाते. पाणी वाढल्यास शरीरातील रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णासाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते.

बाहेरचे खाणे कमी करावे

बाहेरच्या खाण्यामुळे शरीराला विविध आजार जडतात. त्यामुळे बाहेरचे खाणे टाळावे व घरी तयार केलेले अन्न खावे. हिरव्या भाज्या आणि फळे खावीत.

लठ्ठपणा कमी करा

लठ्ठपणामुळे कमी वयात उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावू शकते. विशेषकरून पोटाचा लठ्ठपणा या समस्येच्या मुळाशी असतो. त्यामुळे उच्च रक्तदाबापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी लठ्ठपणा कमी करावा. आठवड्यातून ५ दिवस रोज ३० मिनिटे व्यायाम केल्यास मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहाते व अनेक आजारांपासून संरक्षण होते.

ज्यांच्या कुटुंबात कोणाला तरी उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी नियमितपणे तपासणी करून घ्यावी. काहीजणांमध्ये उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; पण त्यांच्या शरीरात या आजाराची वाढ होत राहाते. त्यामुळे वर्षातून एकदा रक्तदाब तापसणी करून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT