Yoga For Blood Pressure esakal
आरोग्य

Yoga For Blood Pressure : उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका हवी आहे? मग, रोज करा ‘ही’ योगासने

सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा ही समावेश आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Blood Pressure : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा ही समावेश आहे. उच्च रक्तदाब ही एक अशी समस्या आहे की, ज्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, अचानकपणे ही समस्या तुमच्या हृदयासाठी धोकादायक स्थिती बनू शकते.

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर या परिस्थितीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण, याकडे दुर्लक्ष केले तर हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

या समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. या कामी योगा तुमची मदत करू शकतो. आज आपण उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत.

बलासन

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या लोकांसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. हे योगासन नियमितपणे केल्याने तुमचा ताण कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. हे योगासन केल्याने आपले शरीर शांत होते आणि खांद्यावरील आणि मानेवरील ताण कमी होतो.

भूजंगासन

भूजंगासन हे योगासन आपल्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचे परिसंचारण करण्यास मदत करते. रोजच्या ताण-तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. यासोबतच नियमितपणे हे योगासन केल्याने पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अस्थमाच्या रूग्णांसाठी देखील हे योगासन फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रूग्णांनी नियमितपणे या योगासनाचा सराव करावा. यामुळे, उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित होण्यास मदत होईल.

सेतूबंधासन

सेतूबंधासनाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हे योगासन अतिशय उपयुक्त आहे. आपले मन शांत करण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी नियमितपणे या योगासनाचा सराव करावा.

जर तुम्हाला नैराश्याची समस्या असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हे योगासन मदत करते. फक्त यासाठी तुम्ही रोज सराव करायला हवा. उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासोबतच, पोटाच्या समस्या आणि थकवा कमी करण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT