Health news 
आरोग्य

Health : कॅल्शियमची कमतरता दूर करायचीये? मग दूधाऐवजी 'हे' घटक वापरा, हेल्दी राहा

ज्याच्या सेवनाने तुम्ही दूध न पिता शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

ज्याच्या सेवनाने तुम्ही दूध न पिता शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता.

दूध प्यायचं म्हटलं की अनेकजण नाक-तोंड मुरडायला सुरु करतात. विशेषत: लहान मुले यात अधिकची मातब्बर दिसत असतात. लहानांपासून ते वडिलधाऱ्यांपर्यंत बरीच मंडळी अनेकवेळा दूध पिताना नकार देताना दिसतात. मात्र आपल्या आरोग्यासाठी दूध महत्त्वाचे आहे, हे सर्वांना माहिती आहेच. जर आपण दूध पिले नाही तर त्यातून मिळणारे कॅल्शियम कसे भरून निघणार? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच काही गोष्टींची यादी तयार केली आहे. ज्याच्या सेवनाने तुम्ही दूध न पिता शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता. चला तर मग सुरुवात करूया.

डाळिंबाचा रस

डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होणार नाही. मात्र यातून तुम्हाला प्रथिने, कॅल्शियम, थायामिन, रिबोफ्लेविन, फायबर, नियासिन आणि कार्बोहायड्रेट्स असे काही महत्वाचे घटक मिळतील. सोबतच तुम्ही इतर फळे किंवा भाज्यांच्या ज्यूसचाही आहारात समावेश करू शकता.

बीन्स

बीन्स कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. पण सोबतच जीवनसत्त्वे, फायबर, पोटॅशियम, लोह आणि प्रथिने यांसारखे घटकही यात आढळतात. जे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

पांढरे तीळ

दूध न पिता कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्याचा हा एक मार्ग आहे. रोज 2-3 पांढर्‍या तिळाचे लाडू खावेत. जे खायला चविष्ट असतात आणि तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

नारळ (खोबरे)

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हाही घरी लाडू किंवा खीर बनवली जाते तेव्हा त्यात हमखास नारळाचा म्हणजेच खोबऱ्याचा वापर केला जातो. पण यातून तुम्हाला कोणता घटक मिळतो, याचा कधी विचार केला आहे का? नारळ किंवा खोबऱ्यातून अधिक प्रमाणात कॅल्शियम मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT