Diabetic Patients esakal
आरोग्य

Diabetic Patients : आता मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 10 सेकंदात तयार होणार इन्सुलिन, वाचा कसं ते?

मानवी डीएनए विजेच्या साह्याने नियंत्रित करता येणार

सकाळ डिजिटल टीम

Healthcare News : आता मानवी डीएनए विजेच्या साह्याने नियंत्रित करता येणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे त्यांच्या शरीरात 10 सेकंदात इन्सुलिन तयार होऊ शकते. स्वित्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी जगात प्रथमच असा अनोखा प्रयोग केला आहे. यामुळे भविष्यात मानवाला अनेक फायदे मिळतील.

हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, विजेचा वापर करून मानवी जीन्स चालू आणि बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. ही प्रक्रिया अॅक्युपंक्चरमध्ये वापरल्या जाणार्‍या सुईद्वारे करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगाच्या या तंत्राला मिसिंग लिंक म्हटले आहे. ही एक प्रकारची जीन थेरपी आहे. जाणून घ्या काय आहे ही थेरपी आणि त्याचा फायदा लोकांना कसा मिळेल.

काय आहे हा प्रयोग ?

शास्त्रज्ञ म्हणतात, आम्ही एक विशेष प्रकारची जीन थेरपी विकसित केली आहे. त्याच्या मदतीने, ते जनुक सक्रिय केले जाऊ शकते जे मानवांमध्ये इन्सुलिन तयार करण्यासाठी कार्य करते. ही थेरपी विकसित करण्यासाठी त्यांना पाच वर्ष लागली आहेत.

आजच्या काळात स्मार्टवॉचसह अनेक प्रकारचे वेअरेबल गॅजेट्स वापरले जात असल्याचे ते सांगतात. ही गॅजेट्स माणसाचे जीवन बदलत आहेत. अशा युगात इलेक्ट्रॉनिक आणि जैविक प्रणालींमध्ये समन्वय साधला जात आहे.

तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, मानवी जैविक प्रणालीचे प्रोग्रामिंग मागील पिढीकडून मिळालेल्या अनुवांशिक गोष्टींद्वारे केले जाते. आता त्यावर नियंत्रण ठेवता येईल. संशोधनादरम्यान, शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि यूएस एफडीएने अॅक्युपंक्चर सिरींज संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेतली आहे.

इन्सुलिन कसे तयार केले जाईल

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यासाठी 4.5 व्होल्टचा डीसी करंट लावला. यात डार्ट प्रणालीद्वारे चालणाऱ्या बॅटरीमधून 10 सेकंदांसाठी करंट देण्यात येईल.

इंसुलिनच्या निर्मितीसाठी विशिष्ट जनुक सक्रिय करण्यात डार्ट प्रणाली यशस्वी झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अॅक्युपंक्चरच्या सुया या ह्युम स्टेम सेल्स आणि उंदरांवर वापरल्या गेल्या. आता हा प्रयोग यंत्राच्या रूपात तयार करणे हे वैज्ञानिकांचे उद्दिष्ट आहे, जेणेकरुन यंत्राद्वारे मानवाला त्याचा लाभ मिळू शकेल. आता इंटरनेटच्या माध्यमातून शरीराला अशा उपकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हा प्रयोग रुग्णांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो

या प्रयोगाद्वारे, व्यक्ती नियमित काम करताना शरीरात इन्सुलिन तयार करण्यास सक्षम असेल. अशाप्रकारे, डार्ट सिस्टीम मानवांमधील जनुक नियंत्रित करण्यायोग्य असेल. या प्रयोगामुळे मधुमेही रुग्णांच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT