International Dance Day 2024 : esakal
आरोग्य

International Dance Day 2024 : नृत्य हे आध्यात्मिक उपासनेचे साधन अन् सकारात्मक उर्जेचा उत्तम स्त्रोत

International Dance Day 2024 : त्रेता युगापासून नृत्य हे आध्यात्मिक उपासनेचेही साधन म्हणून ओळखल्या जात असल्याचे मत नृत्यांगणा पूजा हिरवडे यांनी व्यक्त केले

सकाळ डिजिटल टीम

International Dance Day 2024 : प्रत्येक व्यक्तीला विविध क्रिया, उपक्रमांमधून आनंद मिळतो. मात्र, नृत्य ही एक अशी कला आहे जी केवळ नर्तकालाच नव्हे तर नृत्य पाहणाऱ्यालाही अतिशय सुखद असा आनंद देते. नृत्य करताना नर्तकाचे संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा एकात्म होतो. यामुळेच त्रेता युगापासून नृत्य हे आध्यात्मिक उपासनेचेही साधन म्हणून ओळखल्या जात असल्याचे मत नृत्यांगणा पूजा हिरवडे यांनी व्यक्त केले.

नृत्याची शक्ती ही अपार आहे. नृत्य करताना नर्तकांचे इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण असते. नृत्य त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या दरम्यान, नृत्य करणाऱ्याला परम आनंदाचा अनुभव येतो. त्यामुळे, नृत्य ही एक आनंद देणारी कला आहे. ‘नृत्यामुळे व्यक्तीला आनंद मिळतो’ यावर विज्ञानानेही शिक्का मोर्तब केले आहे.

नृत्यामुळे व्यक्ती जीवनातील समस्या विसरून जातो. यामुळे, जैविक प्रणालीवर सकारात्मक परिणाम होत मानवाला आरोग्यदायी जीवन लाभते. नाट्यशास्त्रानुसार, लोकांना नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यासाठी नृत्याची निर्मिती करण्यात आली. त्रेता युगात जनतेला दुःखाने आणि जीवनातील अनेक नकारात्मक गोष्टींनी ग्रासले होते. अशा नकारात्मकतेला दूर लोटण्यासाठी भगवान इंद्र आणि इतर देवांनी ब्रह्मदेवाला पाचवा वेद तयार करण्याची विनंती केली. ब्रह्मदेवाने ४ वेदांमधून विविध घटक घेतले आणि पाचवा वेद तयार केला. यालाच नाट्यवेध म्हणतात, अशी माहितीही त्यांनी दिली. (Dance)

'आमच्या नृत्य वर्गामध्ये एक परदेशी पाहुणा आला होता. आमची एक तासाची नियमित नृत्य तालीम पाहिल्यानंतर त्याने मला उत्साहाने विचारले ‘तुम्ही तुमच्या वर्गात फक्त सुंदर दिसणाऱ्या मुलींनाच प्रवेश देता का?’ मी म्हटले, नृत्य आणि नृत्यावरचे प्रेमच त्यांना सुंदर बनवते.' (Health)

-प्रा. पूजा हिरवडे, नर्तक

नृत्य ही मनाला आनंद देणारी एक उत्तम अॅक्टिव्हीटी आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा वेळ मिळेल तेव्हा नृत्याचा सराव हा करायला हवा. त्याने तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप-शिवसेना कार्यालयांवर म्हाडाचा हातोडा; कारवाईवरून पदाधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

Latest Marathi News Live Update : वाघोली परिसरात चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नववा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT