International Day of Yoga 2023 Balance personality through yoga health human personality sakal
आरोग्य

International Day of Yoga 2023 : योगशास्त्रातून करा व्यक्तिमत्त्व संतुलित!

शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आणि आध्यात्मिक हे मानवी व्यक्तिमत्त्वाचे पैलू असतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आणि आध्यात्मिक हे मानवी व्यक्तिमत्त्वाचे पैलू असतात. या पाचही पैलूंमध्ये संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यालाच संतुलित व्यक्तिमत्त्व म्हणतात. संतुलित व्यक्तिमत्त्वाची सुरवात भारतीय संस्कृतीमधील योगशास्त्रातून होते.

बुधवारी (ता. २१) नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. ‘वसुधैवकुटुंबकम्’ ही या वर्षीच्या योगदिनाची संकल्पना आहे. यानिमित्ताने जगभरात योग चळवळ सुरू झाली आहे. याचे महत्त्व योग अभ्यासक डॉ. पल्लवी कव्हाने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंमध्ये समत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यालाच संतुलित व्यक्तिमत्त्व म्हटले जाते. याची सुरवात योगपासून होते. योग ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. ही जपणे आणि त्याचा प्रचार करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या प्रत्येक काम हे योगाच्या आधारावर करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. फक्त आसन आणि प्राणायाम या पुरताच योग मर्यादित नाही. योग चोवीस तास करण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

योगाच्या व्याख्या

महाभारताच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला श्रीमद् भगवद्‍गीतेमध्ये ‘सिद्धय-सिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।’ असा संदेश दिला. तेव्हापासून वेगवेगळ्या काळात योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या करण्यात आल्या.

महर्षी पतंजली यांनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः’ (योग म्हणजे मनःच्या अंतःप्रेरणेवरील नियंत्रण) अशी व्याख्या केली आहे. योगच्या विविध व्याख्या असल्या तरीही त्याचा सार एकच आहे, तो म्हणजे, मनःस्वास्थ. चित्तवृत्तींचा नाश केल्यास आपले आयुष्य योग्यपद्धतीने आनंदी राहून घालवू शकतो, असेही डॉ. कव्हाने यांनी सांगितले.

मोक्षप्राप्ती हेच ध्येय

योग ही आयुष्य संतुलित जगण्याची पद्धत आहे. अष्टांग योग, हटयोग, लययोग, कर्मयोग, ध्यानयोग, मंत्रयोग, कुंडलिनी योग असे योगाचे वेगवेगळे प्रकार असले तरीही मोक्ष प्राप्ती हेच सर्वांचे ध्येय आहे. ध्येयपूर्तीकडे जाण्याच्या मार्गावर संतुलन करणे, हे योगशास्त्रामुळे शक्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

अष्टांग योग

अष्टांग योगमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सर्व गोष्टींचा वापर करून आपण आपले आयुष्य सर्वांगाने सुदृढ आरोग्य जगते येते. संतुलित, समाधानी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी अष्टांग आयुर्वेद महत्त्वाचे ठरते. पातंजल योगसूत्रात सतत निरंतर धारणा करणे, योगची कास धरणे यातून दृढभूमी सात्त्विक राहील. त्यामुळे योगशास्त्रात याला महत्त्व आहे.

बहिरंग योगातून अंतरंग योगात केलेल्या प्रवासातून आपल्याला स्वतःची ओळख होत असते. संतुलित, समाधानी आणि निरोगी जाण्यासाठी अष्टांग आयुर्वेदातील आठ सूत्रांचे अनुकरण करा. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आजार पडण्याची शक्यता खूप कमी होते.

- डॉ. पल्लवी कव्हाने, योग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT