International Yoga Day 2024 esakal
आरोग्य

International Yoga Day 2024 : पंतप्रधान मोदींनी दिला ‘ताडासन’ करण्याचा सल्ला, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

International Yoga Day 2024 : योगाचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी, दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

International Yoga Day 2024 : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. योगाला भारताचा प्राचीन इतिहास लाभला आहे. योगा हे भारताला मिळालेले मोठे वरदान आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

योगाचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी आणि योगाची जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ (International Yoga Day 2024) म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाला दिला होता. त्यानंतर, २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषीत करण्यात आला. आपल्या जीवनातील योगाचे महत्व आणि लोकांना योगासने करण्यास प्रोत्साहित करणे यांसारख्या कारणांसाठी दरवर्षी योग दिन जगभरात साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नियमित योगा करतात. त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये ताडासन या आसनाबद्दल सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात ताडासन करण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे शरीराला कोणते फायदे होतात?

ताडासन करण्याची योग्य पद्धत

  • ताडासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर किंवा चटईवर सरळ रेषेत उभे राहा.

  • त्यानंतर, तुमच्या दोन्ही पायांमध्ये काही इंचाचे अंतर ठेवा.

  • आता दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना चिटकवून बोटे एकमेकांमध्ये गुंतवा.

  • आता तुमच्या खांद्याच्या बरोबरीने हात वरच्या दिशेने करा. या स्थितीमध्ये तुमच्या पायांच्या टाचा वरच्या बाजूला उचला.

  • काही सेकंद याच स्थितीमध्ये राहा. तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

  • त्यानंतर, हळूहळू सामान्य स्थितीमध्ये परत या. हातांची बोटे वेगळी करा.

ताडासन करण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?

  • नियमितपणे ताडासन या योगासनाचा सराव केल्याने उंची वाढण्यास मदत होते.

  • ताडासनाचा सराव दररोज केल्याने शरीराचे संतुलन योग्यरित्या राखले जाते.

  • नियमितपणे या योगासनाचा सराव केल्याने शारिरीक अन् मानसिक आरोग्य उत्तम राहते.

  • मन आणि शरीर स्थिर आणि शांत राहण्यास मदत होते.

  • या योगासनाच्या सरावामुळे मांड्या, पायाचे घोटे आणि गुडघे मजबूत राहतात.

  • ज्या लोकांना हृदयविकार, चक्कर येणे किंवा नसांना सूज आहे, अशा लोकांनी या आसनाचा सराव करणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT