आरोग्य

Health : मुलांमधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' फळाचा रस प्या, रक्त वाढेल..

मुले जशी मोठी होऊ लागतात तशा त्यांच्या पोषणाच्या गरजाही वाढू लागतात.

सकाळ डिजिटल टीम

मुले जशी मोठी होऊ लागतात तशा त्यांच्या पोषणाच्या गरजाही वाढू लागतात. परिणामी वाढत्या वयात कोणता सकस आहार घ्यावा या माहिती अभावी मुलांमध्येही लोहाची कमतरता दिसून येते. याच लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी कमी होऊ लागतात. त्यामुळे मुलांच्या काही शारिरीक तक्रारी सुरु होतात.

याला साध्या भाषेत अॅनिमिया असे म्हटलं जाते. मुलांमध्ये रक्ताची कमतरता असल्यास त्यांच्या आहारात आवश्यक बदल करणे आवश्यक असते आणि ते करता येतात. नियमित आवळ्या खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरुन निघते. त्यामुळे मुलांना आवळ्याचा रस दिल्यास रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होऊ शकते. आज आपण याचे फायदे आणि मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेणार आहोत...

लोहाच्या कमतरतेसाठी आवळा रस

आवळा व्हिटॅमिन 'सी' आणि लोहासारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. विशेषत: अशक्तपणा असेल तर अशा व्यक्तीला आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. मुलांना दिवसातू एकदा त्यांच्या वेळेनुसार आवळा ज्यूस काही प्रमाणात दिला तर त्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. आवळ्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते.

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही आवळा उपयुक्त आहे. त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन 'सी' असते. हे घटक शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. आवळ्याच्या रसाची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात काळे मीठ घालू शकता. याशिवाय गुसबेरी जामही मुलांना पिण्यासाठी देऊ शकता.

मुलांसाठी देण्यासाठी आणखी काही रसांची यादी

  • आवळ्या व्यतिरिक्त अशी अनेक फळे आणि भाज्या आहेत, ज्यांचा रस मुलांमधील लोहाची कमतरता भरून काढू शकतो. त्यामुळे अशा काही फळांची आणि भाज्यांची यादी आपण पाहूया..

  • पालक आणि अननस एकत्र करून बनवलेल्या रसाने शरीरातील लोहाची कमतरताही पूर्ण होऊ शकते.

  • बीटमध्ये अधिक प्रमाणात लोह असते. फक्त बीटाचा रस मुलांना दिला जाऊ शकतो. बीटमध्ये संत्र्यांच्या रस टाकूनही तुम्ही हा रस मुलांना देऊ शकता. या दोन्हींचे मिश्रण केल्याने शरीराला लोह तसेच व्हिटॅमिन 'सी' मिळू शकते.

  • भोपळ्याच्या भाजीमुळे मुलं नक्कीच नाक मुरडू शकतात. परंतु ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लहान मुलांना भोपळ्याचा रस दिला जाऊ शकतो.

  • भोपळ्याचा रस बनवण्यासाठी भोपळा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चवीनुसार त्यात हलकी साखर किंवा मीठ टाका आणि प्या. हे शरीरातील लोहाचे प्रमाण तुलनेत वाढवण्यासाठी मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT