Garlic Use In Summer esakal
आरोग्य

Garlic Use In Summer : उन्हाळ्यात लसणाचा वापर करावा का? तज्ज्ञ सांगतात वापराचे फायदे तोटे

लसूण शरीरासाठी फायदेशीर आहे असे अनेक लोक मानतात पण उन्हाळ्यात ते खाऊ नये असेही म्हटले जाते. मात्र हे कितपत खरं आहे?

साक्षी राऊत

Garlic Use In Summer : आयुर्वेदात लसणाचे अनेक फायदे सांगितले आहेत. यामुळे जेवणाची निश्तितच वाढते, पण त्यात अनेक औषधी गुणधर्मही असतात, जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी तसेच सल्फ्यूरिक अॅसिड, लोह, कार्ब्स, फॅट आणि प्रोटीन आढळतात. ज्याच्या सेवनाने संसर्गाचा धोकाही कमी होतो.

यासोबतच लसूण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम करते. लसूण शरीरासाठी फायदेशीर आहे असे अनेक लोक मानतात पण उन्हाळ्यात ते खाऊ नये असेही म्हटले जाते. मात्र हे कितपत खरं आहे? यावर आरोग्य तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे जाणून घ्या.

सर्दी खोकला लवकर बरा होतो

सगळ्यात आधी आपण लसणाचे फायदे जाणून घेऊया

लसणाच्या सेवनाने बऱ्याच काळापासून असलेली सर्दी, फुफ्फसांमधील दुखणे, निमोनिया आणि अस्थमा यांच्यासारख्या समस्यांतून मुक्ती मिळते. तेव्हा निरोगी आरोग्यासाठी सकाळच्या नित्यक्रिया आटोपून रिकाम्या पोटी रोज एक लसणाची कळी खावी. (Garlic)

उन्हाळ्यात लसूण खावे का?

आता येतो लसूण उन्हाळ्यात खावा की नाही असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांच्यासाठी महत्वाचे

तर लसूण तुम्ही उन्हाळ्यात खाऊ शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात लसूण खाण्यास हरकत नाही पण त्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. वास्तविक, लसणाचा प्रभाव गरम असतो. अशा स्थितीत लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने अॅलर्जी किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यात अॅलिसिन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे यकृताला गंभीर नुकसान होऊ शकते. (Health)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT