Pre-Mature Delivery esakal
आरोग्य

Pre-Mature Delivery : प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस घेणं ठरतं का प्री-मॅच्युअर डिलीव्हरीचं कारण? वाचा सविस्तर

गरोदरपणात स्ट्रेस घेणं हे फार सामान्य आहे मात्रा याचा परिणाम थेट तुमच्या होणाऱ्या बाळावर होतो

साक्षी राऊत

Pre-Mature Delivery : गरोदरपणात सुरुवातीपासून ते पुढले ९ महिने विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात महिलेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरेच बदल घडत असतात. अनेकदा हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये चिडचिडेपणा, राग आणि स्ट्रेसही दिसून येतो. गरोदरपणात स्ट्रेस घेणं हे फार सामान्य आहे मात्रा याचा परिणाम थेट तुमच्या होणाऱ्या बाळावर होतो. तेव्हा या काळात स्ट्रेस घेणं आईसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी किती धोक्याचं ठरू शकतं जाणून घेऊया.

गरोदरपणात स्ट्रेस घेतल्याने हृदयचे कार्य, पाचनशक्ती, इम्यून सिस्टिम आणि मानसिक आरोग्य यावर वाईट परिणाम होतो. अनेक महिलांना असा प्रश्नही पडतो की प्री-मॅच्युअर डिलीव्हरीचे कारण स्ट्रेस असू शकते काय? चला तर अनेक महिलांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.

प्रेग्नन्सीदरम्यान स्ट्रेस घेणं प्री-मॅच्युअर डिलीव्हरीचं कारण ठरू शकतं का?

डॉ. इला जलोटे यांच्या मते, प्रेग्नन्सीदरम्यान जास्त स्ट्रेस घेतल्याने गर्भात असणाऱ्या बाळाचा मानसिक आणि शारीरिक विकास मंदावतो. त्यामुळे दीर्घकाळ स्ट्रेसमध्ये राहिल्यास बाळाच्या वेळेआधीच जन्माचा धोका वाढतो.

स्ट्रेस घेतल्याने गर्भातील बाळाला ऑक्सिजन आणि पोषक तत्व हव्या त्या प्रमाणात पोहोचत नाही. त्यामुळे महिलांनी गर्भधारणेच्या वेळी खुश आणि हसत राहाणे फार महत्वाचे आहे. एक्सपर्टच्या मते गर्भधारणेच्या वेळी अति स्ट्रेस घेतल्याने महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा वाइट परिणाम दिसून येतो.

प्री-मॅच्युअर डिलीव्हरीचे तोटे

तज्ज्ञांच्या मते, प्री-मच्युअर डिलीव्हरीने झालेल्या बाळात आयरनची कमतरता होऊ शकते. या कमतरेमुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास मंदाऊ शकतो. (Women Health)

या काळात पूरेपूर झोप घ्या

प्रेग्नन्सीच्या काळात स्ट्रेसचं मुख्य कारण झोप पूर्ण न होणेही असू शकते. पूरेपूर झोप घेत तुम्ही तुमची स्ट्रेस लेव्हल कमी करू शकता. तेव्हा तुमच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करून घ्या.

रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर करा

तुमच्या दिनचर्चेयत रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर करा. दीर्घ श्वास घेण्याचा अभ्यास, ध्यान आणि योग केल्याने तुमच्या मांसपेशींना आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मित्रांनीच केला घात! मित्राच्या पत्नीसोबतच २ मित्रांचं नको ते कृत्य, ४ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी; विरारमध्ये खळबळ

Sugarcane Price Protest: तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवू; महाडिक ; ‘राजाराम’वर ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Latest Marathi News Live Update : रशियन कच्च्या तेलाबाबत भारताची मोठी रणनीती, दीर्घकालीन करारांची घाई नको; रुपया मजबूत करण्यासाठीही ठरू शकतो दिलासा

बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

SCROLL FOR NEXT