Kareena's Health Tips esakal
आरोग्य

Kareena's Health Tips : हेल्दी राहण्यासाठी बेबो रोज रात्री न विसरता हा पदार्थ टाकून पिते दूध

बाळांतपणानंतर आपल्या फिटनेससाठी प्रत्येकाची उत्सुकता वाढवणारी अशी करीना कपूरची दिनश्चर्या आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Kareena Kapoor Health Secret In Marathi : करीना कपूर ही दोन मुलांची आई असूनही तिने ज्या पद्धतीने स्वतःला मेंटेन केले आहे, ते बघून अनेकांना तिचं कौतुक आणि हेवा वाटत असतो. तिने स्वतःच्या फीटनेससाठी काय खास केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता बहुतेकांना असते. त्यामुळे जे विशेष प्रकारचे दूध करीना रोज रात्री न विसरता पिते ते काय आहे, ज्यामुळे ती फीट राहते.

करीना कपूर आपल्या फीटनेससाठी डाएटिशीयन ऋजुता दिवेकर हिच्या डाएटला फॉलो करते. ऋजुता दिवेकरने एकदा सांगितलं होतं की, करीनाला प्रेग्नंसीमध्ये प्रत्येक दोन तासाने काही ना काही हेल्दी खाण्यासाठी ज्यामुळे तिचे मन शांत आणि आनंदी राहत होतं. ऋजुता यांनी सांगितलं की, ती एक खास प्रकारचे दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी पिते.

काय आहे या दूधाची खासियत?

करीना रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूधात थोडंसं जायफळ घालून पिते. यामुळे नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो आणि शांत झोप लागते.

कोमट दूधात जायफळ घालण्याचे फायदे

  • आयुर्वेदानुसार जायफळमध्ये अशा गोष्टी आहे जे सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवा संतुलीत करते आणि शांत करते.

  • हे कंपाउंड तणाव कमी करून पचनही सुधारते. यामुळे आपले शरीर अन्नातील पोषक तत्वांना चांगल्या प्रकारे शोषून घेते.

  • अँटीऑक्सिडंट आणि मोनोटेरपीन हे जायफळात भरपूर असते. ज्यामुळे अँटी फंगल, अँटी बॅक्टोरीयल आणि अँटी कँसरस प्रोपर्टीज असतात. ज्यामुळे दुखणे, सूज कमी होते.

  • पूर्वीपासूनच जायफळ झोपेचे औषध म्हणून वापरले जाते. कारण यामुळे डोके आणि मन दोन्हीही शांत राहते. शांत झोप लागते.

  • जायफळ योग्य प्रमाणात वापरल्याने पदार्थाची चव वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो.

  • कोमट दूधात जायफळ पावडर, चीमूटभर दालचीनी पावडर, मध मिसळावे. त्यानंतर २,३ मिनीट गॅसवर उकळवावे. नंतर दूध थंड करून प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT