Care Before Eye Flue esakal
आरोग्य

Care Before Eye Flue : डोळ्याच्या साथीचं आलंय टेन्शन? या पोषक आहारातून मिळवा संपूर्ण प्रोटेक्शन

डोळ्यांच्या संसर्ग टाळण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करून घ्या

साक्षी राऊत

Health Care Tips : डोळ्यांच्या साथीने अनेकांना बेजार केले आहे. डोळे येऊ नये म्हणून अनेकांनी गॉगल देखील विकत घेतले. परंतु, या वरच्या उपाययोजनांप्रमाणेच आपल्या आहारात बदल करत आपल्या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

डोळ्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषणाने समृद्ध पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. आहारात सोयाबीनचा समावेश करून डोळ्यांची दृष्टी वाढवता येते.

हायलाइट्स, ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. शरीराचे सर्व भाग निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे डोळे निरोगी ठेवण्यासाठी सकस आहाराचीही गरज आहे. आजची बदलती जीवनशैली, सतत संगणकावर कार्यालयीन काम करणे, मोबाईल बघत जेवणे किंवा मोबाईलवर गेम खेळत बसणे डोळे कमकुवत होत आहेत. अशात, डोळ्याच्या साथीने यात आणखी भर पडली आहे.

हे पदार्थ असावे आहारात

फळे : डोळ्यांसाठी फळे खूप जास्त फायदेशीर असतात. यामुळे आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

अक्रोड : अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ॲसिड असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही तुमच्या न्याहारीमध्ये नट्स खाऊ शकता.

पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे, दृष्टी सुधारण्यास आणि निरोगी राहण्यास मदत होते. (Eye Care)

कडधान्य : कडधान्यामध्ये बायोफ्लेव्होनॉइड्स जास्त भरपूर असतात. जे डोळ्याची रेटिना मजबूत करण्यास मदत करतात. आहारात कडधान्याचा समावेश करून दृष्टी वाढवता येते.

लिंबूवर्गीय फळे : जर तुम्ही आहारात संत्री, द्राक्षे, लिंबू आणि बेरी सारखी फळे समाविष्ट केलीत तर केवळ डोळेच नव्हे तर संपूर्ण शरीर निरोगी ठेवता येईल. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळतात, ज्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT