Kidney Stone  esakal
आरोग्य

Kidney Stone : मुलांना किडनी स्टोन होऊ नये म्हणून त्यांच्या आहारातून आजच वगळा हे पदार्थ

तीस वर्षांआधी किडनीस्टोनची समस्या वयोवृद्धांनाच होते असा समज होता असे शास्त्रज्ञ म्हणाले

साक्षी राऊत

Kidney Stone : अँटिबायोटिक्स, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आणि गरम तापमानामुळे लहान मुलांमध्ये किडनी स्टोनची समस्या हल्ली सामान्य झाली आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये झालेल्या संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. तीस वर्षांआधी किडनीस्टोनची समस्या वयोवृद्धांनाच होते असा समज होता असे शास्त्रज्ञ म्हणाले. मात्र हल्ली ही समस्या सगळ्याच वयोगटाच्या लोकांमध्ये सामान्य झाली आहे.

शरीरात साठलेली खनिजे आणि क्षारांचे साठण्याने मूत्रपिंडात तयार होणारा दगड किडनी स्टोनचे स्वरूप घेतो. शास्त्रज्ञांच्या आकडेवारीतून असे दिसून येते की ही समस्या हल्ली किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चालली आहे. जंक फूड, अँटिबायोटिक्सचा वाढता वापर आणि शरीराच्या तापमानात झालेली वाढ यामुळे शरारात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊन किडनी स्टोन होतो. असे तज्ज्ञांचे मत आहे.

हाय ब्लड प्रेशर आणि वाढते वजन हेसुद्धा एक कारण

किडनी स्टोनतची समस्या ही पिवळ्या रंगाचा मेटाबोलिक डिसॉर्डर आहे, ज्याला नेफ्रोलिथियासिस नावानेही ओळखले जाते. यात कॅल्शियम, ऑक्सलेट आणि फॉस्फोरस सारखी खनिजे मूत्रपिंडात जमा होते. अनेकदा त्याचे स्वरूप रेतीच्या लहान लहान कणांप्रमाणे किंवा गोल्फ बॉलप्रमाणे असते.

काहीवेळी डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधांमार्फत किडनी स्टोन मूत्रपिंडाद्वारे बाहेर पडतात. तर त्याचा आकार मोठा झाल्यास ते मूत्रपिंडात अडकून पडतात. ज्यामुळे तीव्र वेदना आणि ब्लिडिंगच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.

लहान मुलांसाठी जास्त एनर्जी ड्रिंक पिणे घातक ठरू शकते

चिप्स, एनर्जी ड्रिंक आणि सील पॅक जेवणाचे अतिसेवन केल्याने किडनी स्टोनच्या समस्येचा धोका वाढतो. मुलांचे कमी पाणी पिणे आणि फ्रुक्टोजची मात्रा अधिक असलेले ड्रिंक पिणे मुलांसाठी नुकसानदायी ठरते. (Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT