Liver Detox Drink  esakal
आरोग्य

Liver Detox Drink : यकृताच्या निरोगी आरोग्यासाठी 4 हेल्दी ड्रिंक्स, अनेक आजारांचा धोका होईल कमी

यकृतामध्ये घाण साचल्यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. जसे की मधुमेह, लिव्हर सिरोसिस, रक्तदाब आणि लठ्ठपणा.

साक्षी राऊत

Liver Detox Drink : यकृत हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासोबतच आजारांपासूनही बचाव करण्यास यकृत महत्वाची भूमिका बजावते. यकृत पाचन तंत्र मजबूत करते, रक्त शुद्ध करते, चयापचय गतिशील करते आणि शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकते. यकृतामध्ये घाण साचल्यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. जसे की मधुमेह, लिव्हर सिरोसिस, रक्तदाब आणि लठ्ठपणा. तेव्हा यकृत निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी ड्रिंक्स कुठले ते जाणून घेऊया.

यकृत निरोगी ठेवण्यासाठी बाहेरचे खाणे टाळा. तसेच तळलेले अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका. अशा पदार्थांमुळे यकृताला थेट हानी पोहोचते. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी जेवणाबरोबरच हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करणेही आवश्यक आहे. यकृतामध्ये साचलेली घाण साफ करण्यासोबतच या ड्रिंक्समुळे शरीरही निरोगी राहते. फिट क्लिनिकच्या डायटीशियन सुमन यांनी या ४ हेल्दी ड्रिक्सबाबत सांगितले आहे.

लिंबू पाणी

लिंबू शरीरासाठी फार फायदेशीर आहे. हे प्यायल्याने शरीरातील टॉक्झिक पदार्थ शरीराबाहेर पडण्याबरोबच तुमची पचनशक्तीही सुधारते. १ ग्लास कोमट पाण्यात १ लिंबू पिळून तुम्ही हे ड्रिंक पिऊ शकता. हे ड्रिुंक पिल्याने अपचन, गॅसची समस्या दूर होते. कोमट पाण्याच लिंबू पिळून पिल्याने वजन कमी होण्यासही मदत मिळते. (Health)

ग्रीन टी

ग्रीन टी शरीरासाठी फार फायदेशीर असते. ग्रीन टी पिल्याने शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर पडण्याबरोबरच वजनही कमी होते. हा चहा ऑक्सीडेटिव्ह ताण कमी करतो. हा चहा पिल्याने फॅटी लिव्हरची समस्या दूर होते. मात्र दिवसभरात १ कपपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये.

कॅमोमाइल टी

कॅमोमाइल टी शरीराला आराम देण्यासोबतच या टीमुळे चांगली झोप लागते. या टीमध्ये सेस्क्यूटरपीन लॅक्टोन तत्व असतात, जे यकृताला डिटॉक्स करतात. हा चहा पिल्याने तणावापासूनही मुक्ती मिळते. ही टी शरीरातील सूजन दूर करते आणि यकृताला निरोगी ठेवते. (Liver Health)

यकृताच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही हे ४ ड्रिंक्स पिऊ शकता. मात्र तुम्हाला यकृताची संबंधित कुठलाही आजार किंवा समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या ड्रिंक्सचे सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT