Loan Pressure esakal
आरोग्य

Loan Pressure: कर्जाच्या टेन्शनने मनात नको ते विचार येतात? मग हे उपाय आजपासूनच सुरु करा

Nitin Desai Death : नुकतेच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आर्थिक टेन्शनमुळे आत्महत्या केली.

धनश्री भावसार-बगाडे

How To Take Care Of Mental Health In Loan Pressure In Marathi :

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून नुकतेच आपले आयुष्य संपवले. या घटनेने केवळ कलाक्षेत्रच नाही तर सर्वच कलाप्रेमी हळहळले. आर्थिक विवंचनेत अडकलेला माणूस स्वतःला फार एकटं पडल्याचं अनुभवतो, त्याचे मानसिक आरोग्य हरवून बसतो आणि या चिंतेतून नैराश्यात जातो अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात.

पण याच काळात मानसिक आरोग्य जपण्याची फार आवश्यकता असते. या आव्हानाच्या काळात मानसिकस्थिती डळमळणे फार सहाजिक असले तरी विशेष काळजी याच काळात घ्यायला हवी. आर्थिक ताणात मानसिक आरोग्य कसे जपावे हे जाणून घेऊया.

Loan Pressure

आर्थिक नियोजन करा

आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तपशीलवार बजेट तयार करा. यामुळे तुम्हाला नेमका अंदाज येऊन ताण थोडा कमी होईल. शिवाय आपल्या आर्थिक परिस्थितीवर योग्य नियंत्रण मिळवल्याची भावना निर्माण होईल. कर्ज फेडण्याची चिंता कमी होईल. शिवाय कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरुर घ्या.

लहान लहान उद्दीष्टे सेट करा

आर्थिक उद्दीष्ट्ये लहान आणि साध्य करण्यायोग्य स्टेप्समध्ये विभाजीत करा. यामुळे तुम्हाला कर्जाचा मोठा डोंगर जाणवतो ते जाणवणं बंद होईल. शिवाय हळू हळू हे ओझं उतरवणे तुम्हाला शक्य होईल. पण हे ओझं खूप मोठं आहे ही भावना दूर करणं आवश्यक आहे.

Loan Pressure

स्वतःची काळजी घ्या

व्यायाम, ध्यान, दीर्घ श्वास, छंद आणि प्रियजनांसोबत वेळ घालवणे यासारख्या मानसिक आणि भावनिक कल्याणास प्रोत्साहन गोष्टींना प्राधान्य द्या. या गोष्टी तणाव कमी करण्यात आणि तुमचा मूड सुधारण्यास मदत करू शकतात.

स्वतःविषयी नकारात्मक बोलू नका

तणावात नकारात्मक विचार येणं फारच सहाजिक असते. पण नकारात्मकता आपल्याला वास्तवापेक्षा अधिक भयानक चित्र दाखवते, जे वास्तवाला धरून नसते. त्यामुळे या काळात अधिकाधीक वास्तवात राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. ठरवून सकारात्मक विचार करण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करा. आर्थिक अडचणीसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देणं थांबवा आणि त्यापेक्षा उपाय शोधण्यावर भर द्या.

Loan Pressure

आधिच तणावात असणाऱ्या इतर व्यक्तींशी संपर्क कमी करा

जे लोक आधीच तणावात किंवा आर्थिक विवंचनेत असतील अशा लोकांसोबत चर्चा केल्याने तुमचाही ताण वाढू शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून लांब रहा. सतत कर्जाचा विचार केल्याने मानसिकस्थिती बिघडू शकते. त्यामुळे कामाव्यतिरीक्तचा वेळ अधिकाधीक अॅक्टीव्हिटींसाठी वापरा.

अपेक्षा वास्तवाला धरून करा

आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो. तेवढा वेळ देणे, संयम ठेवणे आवश्यक आहे. एका रात्रीत कोणाचीही आर्थिक परिस्थिती सुधारत नसते. त्यामुळे हे वास्तव ओळखून धीर धरणे गरजेचे असते. पण या प्रवासात येणाऱ्या लहान लहान यशांनाही साजरे करा.

Loan Pressure

मोकळेपणे बोला

बऱ्याचदा आर्थिक विवंचनेत असलेले लोक आपल्या ताणात एकलकोंडे होतात. एकट्यात स्वतःच्याच विचारात मग्न राहतात. स्वतःला एकाकी समजतात. त्यामुळे ते इतरांशी संवाद कमी करतात. पण असे करू नये. आपल्यावरील ताणाविषयी कुटुंबीयांशी, मित्रांशी आणि जवळच्या लोकांशी बोलत रहा. भावना बोलून दाखवल्याने थोडा ताण हलका झाल्यासारखे वाटेल. घरच्यांचा आधार मिळू शकेल.

तज्ज्ञांची मदत घ्या

कर्जाच्या ओझ्यामुळे त्रास होणे स्वाभाविक आहे. पण जर तुम्हाला हा ताण सहन होत नाही असे जाणवू लागले, नको ते विचार मनात स्ट्राँग होत असतील तर पहिले मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. थेरपिस्ट किंवा काउंसिलर तुम्हाला चांगली मदत करू शकतील. त्यांच्या मार्गदर्शनाने हा ताण कसा हाताळावा याबाबत मार्गदर्शन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT