Loneliness esakal
आरोग्य

Loneliness : आयुष्यात एकटेपणा जाणवतोय? एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी या टिप्स फॉलो करा

तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांपैकी कोणालाही एकटेपणा जाणवत असेल तर या काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता

साक्षी राऊत

Loneliness : एकटेपणा कुणावरही वाईट प्रभाव पाडू शकतो. ब्रेकअप, घटस्फोट, प्रियजनांचा मृत्यू किंवा व्यवसायिक अपयश यांमुळे अनेकांना एकटेपणा जाणवतो. याशिवाय जास्त विचार केल्यानेही एकटेपणा येऊ शकतो. तुम्हीही ही भावना अनुभवत असाल तर यावर वेळीच उपाय केले पाहिजे. दीर्घकाळ एकटेपणा तुम्हाला मानसिक आजारी बनवू शकतो. तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांपैकी कोणालाही एकटेपणा जाणवत असेल तर या काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

एकटेपणा दूर करण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा

एकटेपणाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नांचा, भविष्याचा विचार करा तसेच तुमच्या जीवनातील चांगल्या क्षणांना आठवा. त्यानंतरही तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

एकटेपणा जाणवण्यामागे बरीच कारणं असू शकतात. एकटेपणाला सामोरे जाण्यासाठी तुमच्या आप्तस्वकियांशी बोला, तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला, तो तुमचा मित्र किंवा नातेवाईकही असू शकतो. तुमच्या भावनांवर चर्चा करा. असे केल्याने तुम्हाला हलके वाटू शकते.

सोशल मीडियाशिवाय असे अनेक अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही नवीन लोकांशी कनेक्ट होऊ शकता. एकटेपणावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नवीन लोकांशी संपर्क साधणे आणि मित्र बनवणे. तुम्ही या लोकांसह नवीन सुरुवात करू शकता.

इतरांशी संपर्क साधण्याव्यतिरिक्त, एकटेपणाशी लढण्यासाठी व्यायाम, निरोगी आहार, झोप, सूर्यप्रकाशात स्नान करणे सुरू करा. व्यायामामुळे मेंदूमध्ये एंडोर्फिन हार्मोन्स तयार होतात. जे मूड सुधारण्यास आणि चांगले वाटण्यास मदत करेल. (Mental Health)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT