Depression Causes
Depression Causes  sakal
आरोग्य

Depression Causes : 'या' कारणांमुळे येऊ शकते डिप्रेशन; वेळीच व्हा सावध, नाहीतर...

सकाळ डिजिटल टीम

Depression Causes : सध्या बदलत्या लाईफस्टाईलनुसार डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण डिप्रेशनचा शिकार होत आहे. डिप्रेशन मुळात एक मानसिक स्थिती आहे ज्यामुळे आपल्याला त्रास होतो.

डिप्रेशनची लक्षणे आणि त्यावर कोणते उपाय करायचे? याविषयी आपण नेहमी जाणून घेतो पण तुम्हाला डिप्रेशनची कारणे माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. या काही कारणांमुळे डिप्रेशन येऊ शकते त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. (main causes for depression healthy lifestyle)

१. जर तुमच्या आजुबाजूला डिप्रेशन असेल, किंवा वातावरण उत्तम नसेल तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते. त्यामुळे तुम्ही कोणत्या वातावरणात राहतात आणि वाढतात, हे जास्त महत्त्वाचं आहे.

२. जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडली असेल ज्याचा तुमच्या जीवनावर संपुर्णपणे नकारात्मक प्रभाव पडला असेल, तेव्हा तुम्हाला त्या घटनेमुळे डिप्रशेन येऊ शकते. अशाप्रकारचे डिप्रेशन लाईफटाईम तुमच्या आयुष्यावर परिणाम करत असते.

३. जर तुम्हाला दिर्घकाळ दुखणे किंवा आजार असेल तर तुम्ही डिप्रेशनचा शिकार होऊ शकता.

४. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा तुमची झोप अपूर्ण होत असेल तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते.

५. जर तुम्हाला व्यसन असेल तर तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते. विशेषत: ड्रग्सच्या सेवनामुळे अनेकजण डिप्रेशनचा शिकार होतात.

६. याशिवाय स्वत:ला कमी समजणे, यामुळेही डिप्रेशन येऊ शकते.

७. आर्थिक समस्येमुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते.

८. नातेसंबंधात तणाव, वैवाहीक आयुष्यात अडचणी यामुळेही तुम्ही डिप्रेशनचा शिकार होऊ शकता.

९. एखाद्या आजारने ग्रस्त असाल तर वारंवार इंजेक्शन आणि औषधांमुळे तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT