A Milestone in Male Contraception, Hormone-Free Birth Control Pill for Men Passes Human Trials sakal
आरोग्य

Male Birth Control Pill: काय सांगता? आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी? पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी

Male Contraceptive Pill Approved Human Trial: हार्मोनशिवाय काम करणारी YCT-529 ही पुरुष गर्भनिरोधक गोळी पहिल्या मानवी चाचणीत यशस्वी ठरली आहे.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. अनेक वर्षांपासून कुटुंब नियोजनाची जबाबदारी प्रामुख्याने महिलांवरच राहिली आहे.

  2. आता वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी हार्मोनशिवाय काम करणारी गर्भनिरोधक गोळी विकसित केली आहे.

  3. YCT-529 नावाच्या या गोळीची पहिली मानवी सेफ्टी चाचणी यशस्वी ठरली असून ती स्पर्म तयार होणं काही काळासाठी थांबवते.

Male Contraceptive Pills: अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये कुटुंब नियोजनासाठी विविध उपाययोजना आणि नियम राबवले जात आहेत. मात्र बहुतांश वेळा गर्भनिरोधक पर्यायांचा वापर हा महिलांवरच अधिक प्रमाणात येतो. ही जबाबदारी केवळ महिलांवर न पडता पुरुषांनीही तेवढाच सहभाग घ्यावा, यासाठी आता वैज्ञानिकांनी एक महत्त्वाचं आणि पुढचं पाऊल उचललं आहे.

काय आहे ही गर्भनिरोधक गोळी?

युनिव्हरसिटी ऑफ मिनेसोटा कॉलेज ऑफ फार्मसी या विद्यापीठात केलेल्या संशोधनात हार्मोनशिवाय काम करणाऱ्या पहिल्या पुरुष गर्भनिरोधक गोळीचा शोध लावण्यात आला. YCT-529 नावाची नवी गर्भनिरोधक गोळी पुरुषांसाठी तयार करण्यात आली असून, तिची पहिली मानवी सेफ्टी चाचणी यशस्वी झाली आहे. ही गोळी हार्मोनशिवाय काम करते आणि स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया काही काळासाठी थांबवते.

ही गोळी पुरुषांच्या शरीरात स्पर्म तयार करणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रोटीनवर काम करते, ज्याला रेटिनॉइक अॅसिड रिसेप्टर अल्फा असं म्हणतात. सामान्यतः व्हिटॅमिन A या प्रोटीनला सक्रिय करतं आणि स्पर्म तयार होतो. पण ही गोळी व्हिटॅमिन A ला ते काम करू देत नाही, त्यामुळे स्पर्म तयार होणं थांबतं आणि पुरुष काही काळासाठी वंध्य (Infertile) होतो.

ही गोळी सध्या अनेक देशांसाठी बदल घडवणारी आणि लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण आजपर्यंत पुरुषांसाठी कॉन्डोम आणि नसबंदी (Sterilization), असे फक्त दोनच पर्याय उपलब्ध होते. मात्र आता त्यात गर्भनिरोधक गोळीचा समावेश झाला आहे.

चाचणी दरम्यान काय समोर आले?

प्राण्यांमधील चाचणी

- नर उंदरांमध्ये या गोळीमुळे वंध्यत्व (Infertility) निर्माण झालं आणि केवळ चार आठवड्यांच्या वापरातच गर्भधारणा टाळण्यात ९९% यश मिळालं.

- माकडांमध्ये २ आठवड्यांत स्पर्म संख्येत मोठी घट झाली आणि गोळी बंद केल्यावर १०–१५ आठवड्यांत प्रजनन क्षमता (Fertility) पूर्णतः परतली.

मानवी चाचणी

सुरुवातील चाचणीत १६ पुरुषांचा समावेश होता. या पुरुषांनी आधीच नसबंदी (Sterilization) केलं होतं, जेणेकरून गोळीचा दीर्घकालीन परिणाम प्रजननक्षमतेवर होणार नाही.

- या चाचणीत काहींना प्लेसिबो, काहींना ९० मिग्रॅम, तर काहींना १८० मिग्रॅम डोस देण्यात आले.

- शरीरावर होणाऱ्या परिणामावर काय फरक पडतो हे तपासण्यासाठी काहींनी गोळी उपाशीपोटी घेतली तर काहींनी जेवणानंतर गोळी घेतली .

- सर्वात चांगला परिणाम १८० मिग्रॅम डोसमध्ये दिसून आला.

- माणसांमध्ये गोळी सुरू केल्यानंतर दोन आठवड्यांत स्पर्मची संख्या कमी होऊ लागली.

- औषध थांबवल्यानंतर, उंदीर आणि माणसांसारखे इतर प्राणी दोघांनाही पुन्हा संपूर्ण प्रजनन क्षमता (Fertility) मिळाली. उंदरांना ६ आठवड्यांत तर इतर प्राण्यांना १० ते १५ आठवड्यांत स्पर्मची संख्या पूर्ववत झाली.

- सगळ्या चाचणी गटांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत.

YCT-529 गोळीची वैशिष्ट्यं

हार्मोनशिवाय काम करणारी

यामुळे मूड स्विंग्स, वजन वाढ, यौन इच्छा कमी होणे असे साइड इफेक्ट्स होत नाहीत.

उलटवता येणारी प्रक्रिया (Reverse Process)

गोळी बंद केल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांत पुन्हा स्पर्म तयार होऊ लागतात आणि प्रजनन क्षमता (Fertility) परत येते.

दैनंदिन डोस

ही गोळी दररोज घ्यावी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु पुढील चाचणीत अधिक स्पष्टता येईल.

पुढचे टप्पे

- आता २८ आणि ९० दिवसांच्या कालावधीसाठी नवीन ट्रायल सुरू आहे, ज्यात गोळी स्पर्मवर कितपत परिणाम करते हे पाहण्यात येणार आहे.

- पुढील चाचण्यांमध्ये सहभागी पुरुषांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

- गर्भधारणेवर होणारा प्रत्यक्ष परिणाम तपासता येण्यासाठी भविष्यात कपल्सवरही चाचणी केली जाणार आहे.

FAQs

1. पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी आहे का?
- होय, अलीकडेच पुरुषांसाठीची गर्भनिरोधक गोळी विकसित करण्यात आली आहे. ही हार्मोनशिवाय काम करणारी गोळी आहे आणि तिच्या सुरुवातीच्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

2. जर एखाद्या पुरुषाने गर्भनिरोधक गोळी घेतली, तर काय होतं?
- ही गोळी शरीरात स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया काही काळासाठी थांबवते. त्यामुळे पुरुष काही कालावधीसाठी वंध्य (Temporarily Infertile) होतो, पण गोळी थांबवल्यानंतर पुन्हा प्रजनन क्षमता (Fertility) पूर्ववत होते.

3. पुरुषांसाठी अशी गोळी मिळू शकते का?
- सध्या YCT-529 गोळी अजून चाचणी टप्प्यात आहे आणि बाजारात उपलब्ध नाही. जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तर पुढील काही वर्षांत ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Irani: स्मृती इराणींनी पॉलिटिकल कमबॅकची दिली हिंट...; जाणून घ्या, नेमकं काय म्हटलंय?

ENG vs IND, 4th Test: जैस्वाल-सुदर्शनची अर्धशतकं, पण रिषभ पंतच्या 'रिटायर्ड हर्ट'ने वाढवली चिंता; जाणून कसा होता पहिला दिवस

U19 ENG vs IND: वैभव सूर्यवंशी शून्यावर आऊट, पण कर्णधार आयुष म्हात्रेचं वादळी शतक; ड्रॉ कसोटीसह दौरा संपला

Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी उपराष्ट्रपती पदाबाबत सूचवलं ‘हे’ मोठं नाव, अन् म्हणाले...

Rishabh Pant Injury: टीम इंडियाला धक्का! रिषभ पंतला बॉल लागला, पायातून रक्त आलं, गाडीत बसून सोडावं लागलं मैदान; Video

SCROLL FOR NEXT