Mail Fertility esakal
आरोग्य

Male Fertility : वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय काय असावं? या वयानंतर थांबते स्पर्म निर्मिती...

वडील होण्यासाठी पुरुषांचे साधारण वय काय असावे हे तुम्हाला ठाऊक आहे काय?

सकाळ ऑनलाईन टीम

Male Fertility : योग्य वयात मुले झालीत तर काँम्प्लिकेशन्स कमी असतात. मात्र तुम्ही बघत असाल की टीव्ही सेलिब्रिटीज वयाच्या चाळीशीतही आई-वडील होताय. मात्र वडील होण्यासाठी पुरुषांचे साधारण वय काय असावे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

वडील होण्यासाठीचं योग्य वय कोणतं?

तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. मात्र पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्ती वयाच्या 92 व्या वर्षी बाळाचा बाबा झाला. मात्र संशोधकांच्या मते मुल जन्माला घालण्यासाठी पुरुषांचं वय फार महत्वाचं ठरतं. वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांमध्ये वडील होण्याची क्षमता मंदावते.

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमधील स्पर्मचं उत्पादन कधीच थांबत नाही. मात्र वयानुसार, स्पर्मचं डीएनए नुकसान होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

अनेक अभ्यासांमधून हे समोर आलंय की, जेव्हा पुरुष फार वाढत्या वयात पिता होतात तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार होऊ शकतात. 2010 च्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की, 40 वर्षांनंतर वडील बनलेल्या पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका पाचपट आहे.

या वयानंतर स्पर्मची निर्मिती थांबते

जागतिक आरोग्य संघटनेने स्पर्मचे काही निकष ठेवले आहेत. ज्यावरून निरोगी स्पर्म ठरवले जातात. यामध्ये स्पर्मची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये हे स्पर्म पॅरामीटर खराब होऊ लागतं.

या वयात पुरुष असतो सर्वात फर्टाइल

22 ते 25 वर्षांच्या दरम्यान, पुरुष सर्वात फर्टाइल असतात. अशा परिस्थितीत, त्यांना 35 व्या वर्षात मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वयानंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. जर तुम्ही वयाच्या 45 वर्षांनंतर मूल होण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

Cheque Clearance Rule: आरबीआयचा मोठा निर्णय; आजपासून चेक लगेच क्लिअर होणार, बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता; हवामानशास्त्र तज्ज्ञ डॉ. डाखोरे यांचा इशारा

AVN Disease: एव्हीएन प्रमुख कारण, अत्याधुनिक उपचारांनी सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य; तारुण्यातच ‘हिप जॉइंट रिप्लेसमेंट

Sangli Politics : शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का! आमदार पूत्र करणार भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT