शरीर निरोगी ठेवायचं असेल तर आहारामध्ये धान्यांसोबत Foodgrains भाज्या आणि फळांचा समावेश असणं गरजेचं आहे. यामुळे शरीराला आवश्यक ती पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यास आणि शरीराची झिज भरुन काढण्यास मदत होते. Marathi Health Tips Pomegranate Benefits for Body to get vitamins and Proteins
खास करून फळांमधून Fruits मिळणारी व्हिटॅमिन्स आणि खनिजांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. यापैकीच एक म्हणजे डाळिंब Pomegranate. डाळिंब किंवा डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे तर होतातच शिवाय यामुळे अनेक आजार Illness दूर होण्यासही मदत होते.
डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन Protein, कार्बोहायड्रेट, फायबर, आयरन, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही पोषक तत्व आढळतात. तेव्हा आज आपण डाळिंबाच्या ज्यूसचे फायदे जाणून घेऊयात.
रक्त पातळ होण्यास मदत- रक्त पातळ होण्यासाठी डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन फायदेशीर ठरतं. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होणं तसंच रक्ताच्या गुठळ्या होणं अशा समस्या दूर करण्यासाठी डाळींबाचा ज्यूस उपयुक्त आहे. नियमितपणे या ज्यूसचं सेवन केल्यास रक्त पातळ राहण्यास मदत होते.
हे देखिल वाचा-
कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत- डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. खास करून डाळिंबामध्ये पॉलिपिनॉल्स नावाचं अँटीऑक्सिडंट हे इतर फळांच्या तुलने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. यामुळे लो डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी आणि रेड वाइनच्या तुलनेत डाळिंबाच्या ज्यूसमध्ये ३ पट जास्त अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यामुळे हृदयाचं आरोग्य Heart Health चांगलं राहण्यास मदत होते.
अॅनिमियाचा धोका कमी होतो- डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणाच आयर्न आढळतं. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन बूस्ट होण्यास मदत होते. तसचं शरीरामध्ये लाल रक्त पेशी वाढण्यासही मदत होते. त्यामुळेच नियमितपणे डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन केल्यास अॅनिमियाचा धोका दूर होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते- डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. तसचं यातील अँटीऑक्सिडंट्सं मुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
पुरुषांची फर्टिलिटी वाढण्यास मदत- डाळिंबाच्या ज्यूसमुळे पुरुषांमधील स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत होते. तसंच या ज्यूसच्या सेवनामुळे सेक्स ड्राईव्ह वाढतो. डाळिंबाच्या ज्यूसचं नियमित सेवन केल्यास पुरुषांमध्ये स्पर्मची निर्मिती वाढण्यास मदत होते.
डाळिंबाच्या ज्यूसमध्ये असलेल्या नायट्रेटमुळे पुरुषांमधील प्रायव्हेट पार्टमध्ये ब्लड फ्लो वाढण्यास मदत होते. यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन सारखी समस्या दूर होण्यास मदत होते.
पचनशक्ती सुधारते- डाळिंबाच्या ज्यूसच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसचं भूक वाढण्यासाठी देखील डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी डाळिंबाच्या ज्यूसमध्ये थोडं सैंधव मीठ टाकून त्याचं सेवन केल्यास भूक वाढण्यास मदत होते.
त्वचा उजळते- डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच मोठ्या प्रमाणात अँटी एजिंग गुण आढळतात. तसचं डाळिंबामधील अनेक पोषक तत्वांमुळे त्वचेवर खास येणं, जळजळ, सूज अशी समस्या दूर होतात. डाळिंबाच्या ज्यूसच्या सेवनामुळे त्वचेतील कोवेजेन बूस्ट होण्यास मदत होते. यामुळ चेहरा उजळून चेहऱ्यावर ग्लो येतो.
अशा प्रकारे डाळिंबाच्या ज्यूसचं नियमित सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.