गुणकारी काकडीच्या बिया Eakal
आरोग्य

Piles Problem दूर करण्यासाठी काकडीच्या बिया ठरतील रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

काकडीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, फायबर उपलब्ध असून या बिया लॅक्सटेसिव म्हणूनही कार्य करतात. या गुणधर्मांमुळेच खास करून मुळव्याधाची समस्या असलेल्यांसाठी काकडीच्या बिया फायदेशीर ठरू शकतात

Kirti Wadkar

आपल्यापैकी अनेकजण कायमच काकडीचं Cucumber सेवन करतता. कधी जेवणासोबत, कधी सलाडमध्ये काकडी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. मात्र तुम्ही कधी केवळ काकडीच्या बियांचा सेवन केलं आहे का? या प्रश्नाने अनेकांचा गोंधळ उडू शकतो. Marathi Health Tips Use Cucumber Seeds to get relief from piles

कारण सगळेच काकडी Cucumber खाताना त्यासोबत त्याच्या बियांचं देखील सेवन करतातच. मात्र इथं आम्ही केवळ काकडीच्या बियांबद्दल Cucumber Seeds म्हणत आहोत. केवळ काकडीच्या बियांचं सेवन हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात.

काकडीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, फायबर उपलब्ध असून या बिया लॅक्सटेसिव म्हणूनही कार्य करतात. या गुणधर्मांमुळेच खास करून मुळव्याधाची समस्या असलेल्यांसाठी काकडीच्या बिया फायदेशीर ठरू शकतात. cucumber seeds benefits

पाहुयात मुळव्याधामध्ये काकडीच्या बियांच्या सेवनाचे काय फायदे आहेत ते

आतड्यांचं कार्य जलद होतं- काकडीच्या बियांच्या सेवनामुळे आतड्यांचं कार्य सुरळीत आणि जलदगतीने होण्यास मदत होते. या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि रफेज असतं. हे रफेज पोटातील पाणी शोषून घेत आणि

वास्तविक, त्यामध्ये रफेज आणि फायबरचे प्रमाण चांगले असते आणि हे रफेज पोटातील पाणी शोषून घेते आणि नंतर मलामध्ये अतिरिक्त प्रमाणात जोडून आतड्याची हालचाल गतिमान करते.त्यानंतर मलामध्ये अतिरिक्त बल्क जोडला गेल्याने आतड्यांचं कार्य जलद होतं.

परिणामी मल उत्सर्जनास त्रास होत नाही. या बियांच्या सेवनामुळे मुळव्याधाशी संबंधीत मल कठिण होणं, आतड्यांना सूज येणं किंवा वेदना होणं अशा समस्या कमी होतात.

हे देखिल वाचा-

लॅक्सेटेटिव म्हणून काम करतात- काकडीच्या बिया या लॅक्सटेसिव म्हणून काम करतात. म्हणजेच यातील तो गुणधर्म ज्यामुळे पोटातील मल मऊ होऊन ते सहज शरीराबाहेर पडण्यास मदत होते. या बियांमधील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

मुळव्याधीमध्ये काकडीच्या बियांचं सेवन कसं करावं

मुळव्याधीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काकडीच्या बियांचं विविधप्रकारे सेवन करू शकता. यात

काकडीच्या बियां मिक्सरमध्ये भरड वाटून त्यात पाणी टाकून एखाद्या ड्रिंक प्रमाणे तुम्ही या बियांचं सेवन करू शकता.

२. तसचं या बिया रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही या बियांचं सेवन करू शकता. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. अशा प्रकारे काकडीसोबतच काकडीच्या बियादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT