Men's Health esakal
आरोग्य

Men's Health : पुरुषांनी ही भाजी आवर्जून खावी, हिमोग्लोबिन वाढण्याबरोबरच तुम्हाला मिळेल भरपूर एनर्जी

चला तर आज आपण अशा भाज्यांबाबत जाणून घेऊया ज्या खाल्ल्याने पुरुषांचे आरोग्य सुधारते

साक्षी राऊत

Men's Health : धावपळीच्या आयुष्यात पुरुषांना सहसा स्वत:कडे विशेष लक्ष द्यायला वेळ नसतो. पुरुषांच्या खांद्यावर घराची जबाबदारी, बाहेरची कामे, ऑफिसची कामे अशा बऱ्याच जबाबदाऱ्यांचे ओझे असते. अशात पुरुषांनी त्यांच्या तंदुरुस्त आरोग्यासाठी स्वत:कडे विशेष लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. चला तर आज आपण अशा भाज्यांबाबत जाणून घेऊया ज्या खाल्ल्याने पुरुषांचे आरोग्य सुधारते.

पुरुषांनी आवर्जून खावी ही भाजी

तज्ज्ञांच्या मते पुरुषांना निरोगी राहायचे असेल तर हिरव्या पालेभाज्या खायलाच हव्यात. यापैकी बहुतेकांना पालक आहारात घेण्याचा सल्ला दिला जातो. या भाजीतून शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात जे खूप फायदेशीर आहेत.

पुरुषांनी पालक आहारात घेण्याचे ७ जबरदस्त फायदे

1. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे ते खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. त्यामुळे एनर्जी आणि रक्ताची कमतरता भासत नाही.

2. या हिरव्या भाजीमध्ये व्हिटॅमिन-k देखील आढळते, जे शरीरात कॅल्शियम शोषून घेते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. (Vegetable)

3. पालक अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. यामुळे अनेक आजार दूर राहतात, तसेच शरीराची एकूण वाढ होण्यास मदत होते.

4. पालक खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन-A मिळते, त्यामुळे डोळ्यांची दृष्टी तेज होते.

5. पालक मॅग्नेशियम आणि झिंकचा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील या घटकांची कमतरता भरून निघते, आणि तुम्ही तंदुरुस्त राहाता.

6. पालक मानसिक आरोग्यासाठी उत्कृष्ट मानली जातो, त्यामुळे त्याचा नियमित आहारात समावेश करावा.

7. पालक खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि वजनही वाढत नाही.

सकाळी वेळेत उठून रोज वॉक करण्यानेसुद्धा पुरुषांचं आरोग्य सुधारतं. फक्त पालकच नाही पोषक तत्वांनीयुक्त पालेभाज्या खाऊन पुरुष कायम एनर्जेटिक आणि तंदुरुस्त राहू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT