Men's Health Tips  esakal
आरोग्य

Men's Health Tips : पुरुषांनो, म्हातारपणीही स्टॅमिना टिकवायचाय? मग या 9 टिप्स फॉलो करा

उतारवयात स्टॅमिना कमी होतो, अनेक आजार जडतात त्यासाठी या ९ सवयी लावून घ्या.

धनश्री भावसार-बगाडे

These 9 Habits Good For Men's Health : सततची धावपळ आणि तणावपूर्ण दिनश्चर्या यामुळे पुरुषही स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतात. अधिक वेळ घराबाहेर आणि चुकीच्या सवयी यामुळे ते आपली ताकद आणि स्टॅमिना हरवून बसतात. त्यामुळे एक्सपर्ट्स म्हणतात की पुरुषांना आपल्या तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते. यासाठी काही हेल्दी हॅबीट्स स्वीकारायला हव्यात. त्या कोणत्या जाणून घ्या.

मेडिकल कंटेंट रायटर डायटे इती जैन यांनी सांगितलं की, महिलांप्रमाणे पुरुषांमध्ये हृदय आणि इतर आजारांपासून वाचण्यासाठी अॅस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स नसतात. त्यामुळेच हार्ट अॅटॅक, वजन वाढणे, डायबेटीस, हाय कोलेस्ट्रॉल, रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका पुरुषांमध्ये जास्त असतो.

Men's Health Tips

यावर उपाय म्हणून त्यांनी पुरुषांना ९ चांगल्या सवयी लावून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या शरीराला सगळे आवश्यक पोषक तत्वे मिळतील आणि सर्वच अवयव पूर्ण क्षमतेने काम करू शकतील. त्यामुळे म्हातारपणी आजारपण आणि अशक्तपणा दूर ठेवत पुरुषांची शारीरिक क्षमता टिकवून ठेवते.

संपूर्ण आहार घ्या

डायटिशीयन इती जैन सांगतात डाएटमध्ये संपूर्ण आणि अनप्रोसेस्ड फूड घ्यावे. भरपूर प्रमाणात फळ, भाज्या, अख्खे धान्य, लीन प्रोटीन आणि हेल्दी फॅट घ्यावे. हे खाद्य पदार्थ आवश्यक पोषक तत्व, फायबर आणि अँटीऑक्सिडंट प्रदान करतात. यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारतं.

Men's Health Tips

प्रोटीन वाढवावे

स्नायूंच्या वाढीसाठी, दुरूस्तीसाठी आणि देखभालीसाठी प्रोटीन महत्वपूर्ण आहे. प्रत्येक जेवणात शेंगा, चिकन, मासे, टोफू, बीन्स किंवा ग्रीक दही यांसारख्या पातळ प्रथिनांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.मसल्स सिंथेसीस आणि रिकव्हरी वाढवण्यासाठी संपूर्ण दिवसात संतुलित प्रमाणात प्रोटीन घेत रहावे.

नाश्ता टाळू नये

आपले मेटाबोलिझन सुधारण्यासाठी आणि एनर्जी मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात संतुलीत नाश्त्याने करावी. भूक शमवण्यासाठी आणि फोकस वाढवण्यासाठी नाश्त्यात प्रोटीन, अख्खे धान्य आणि फळे किंवा भाज्या यांचे मिश्रण असावे.

Men's Health Tips

हायड्रेशनवर लक्ष द्या

पूर्ण दिवस आवश्यक तेवढे पाणी पिऊन स्वतःला चांगल्या प्रकारे हायड्रेट ठेवा. पाणी पचन, मेटाबोलीझम आणि शरीराच्या सर्वच क्रियांसाठी आवश्यक असते. याच्या कमीने तुमचा स्टॅमिना, ताकद लगेच कमी होते आणि अशक्तपणा येतो.

हेल्दी फॅट्स विसरू नका

आपल्या आहारात हेल्दी फॅट्स असणारे पदार्थ नक्की वापरा. यामुळे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवणारे आवश्यक फॅटी अॅसिड मिळते. गुड कोलेस्ट्रॉलने धोकादायक एलडीएल, वीएलडीएल और ट्रायग्लिसरायड्स कंट्रोलमध्ये राहतात. एवोकाडो, नट्स, बिया आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी फॅट्स असतात.

Men's Health Tips

जेवणाची तयारी आणि प्लॅनिंग स्वतःच करा

तुम्हाला तुमच्या जेवणाची तयारी आणि प्लॅनिंग स्वतःचं अॅडव्हांसमध्ये करायला हवी. ज्यामुळे भूक लागल्यावर अनहेल्दी खाणे टाळता येइल. ही सवय तुम्हाला हेल्दी फूड खाणे, नियंत्रणात खावे आणि संपूर्ण दिवस पोषण देण्यास मदत करते.

जास्त खाऊ नये

वजन कंट्रोल करण्यासाठी जास्त खाणे टाळावे. जेवणाचे ताट लहान असावे. भूक लागल्यावरच खावे. संतुलीत आणि कमी खाण्याने स्थूलपणा दूर राहतो. ज्यामुळे हार्ट डिसीज टाळता येतील. जबरदस्ती आणि भूकेपेक्षा जास्त खाणं टाळा.

Men's Health Tips

नियमित व्यायाम

आपल्या फिजिकल रुटीनमध्ये कार्डिओ, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आणि फ्लेक्सिबीलिटी एक्सरसाइजचे मिक्सचर असावे. प्रत्येक आठवड्यात कमीत कमी १५० मिनीट मॉडरेट इंटेंसिटी एरोबिक अॅक्टिव्हीटी करण्यावर लक्ष द्या. फिटनेस आणि मसल्स वाढवण्यासाठी दोन दिवस वेट ट्रेनिंग आवश्यक आहे.

झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट

चांगले आरोग्य आणि रिकव्हरीसाठी आवश्यक तेवढी झोप घेणे गरजेचे आहे. रोज रात्री ७ ते ८ तास चांगली झोप मिळणे आवश्यक आहे. रिलॅक्सेशन टेक्निक, हॉबी, इमोशनल सपोर्ट इत्यादीने स्ट्रेस कमी करावा. याचा तुमच्या आरोग्यावर आणि खाण्याच्या सवयीवर खोल परिणाम होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT