Mental Health Tips News Sakal
आरोग्य

Stress Relief Food मानसिक व शारीरिक तणाव कमी करायचाय? या 2 फळांचं करा सेवन

आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या माहितीनुसार आहारात कोणत्या फळांचा समावेश केल्यास शारीरिक तसंच मानसिक आरोग्यास लाभ मिळतील, याची माहिती जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

धकाधकीच्या लाइफस्टाइलमध्ये प्रत्येकालाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे शारीरिक तसंच मानसिक तणाव निर्माण होतो. मानसिक ताणतणाव वाढल्यास आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते, असे आपण अनेकदा तज्ज्ञमंडळींकडून ऐकले असेलच. चिंता, ताण अधिक वाढल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. 

ही समस्या कमी करण्यासाठी आपण व्यायामाप्रमाणेच पौष्टिक खाद्यपदार्थांचेही सेवन करण्यावर भर दिला पाहिजे. आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनीही ताणतणाव कमी करण्यास उपयुक्त असणाऱ्या फळांची माहिती सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बत्रा यांच्या माहितीनुसार, “केळी आणि अ‍ॅव्होकाडो ही फळे तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. ज्यामुळे मनाला त्वरित आराम मिळू शकतो”.

तणाव दूर करण्यासाठी केळी आणि अ‍ॅव्होकाडो ही फळे कशी मदत करू शकतात?

केळी

केळे या फळामध्ये व्हिटॅमिन बी 6 हे पोषकघटक असतात, ज्यामुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे मूड चांगला होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त या फळामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अ‍ॅसिडही असते, ज्यामुळे मेंदू शांत होण्यास मदत मिळते.

अ‍ॅव्होकाडो

अ‍ॅव्होकाडो फळामध्ये व्हिटॅमिन बी असते, ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 6 आणि फॉलेट यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश असतो. हे सर्व पोषक घटक शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करून ताण कमी करण्याचे कार्य करतात.  

बत्रा यांनी शेअर केलेल्या अन्य एका पोस्टमध्ये शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषणतत्त्वांची माहिती दिली आहे. ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. 

जाणून घेऊया पोषणतत्त्वांची यादी

  • मॅग्नेशिअम - या सूक्ष्म तत्त्वाचा शरीराच्या मज्जासंस्थेवर चांगला परिणाम होतो. हे स्नायूंना आराम देण्याचे,  रक्तदाब नियंत्रित करण्याचे आणि शरीराचे हाडे मजबूत ठेवण्याचे कार्य करतात.  

  • कार्बोहायड्रेट्स -या पोषकतत्त्वामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून तणाव कमी होण्यास मदत मिळते.  

  • व्हिटॅमिन सी - तणाव जास्त प्रमाणात वाढतो, त्यावेळेस शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी करण्याचे आणि रक्तदाब नियंत्रणात आणण्यात व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. 

  • फॉलेट: एकाग्रता वाढवण्यासाठी आणि फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करण्यात फॉलेट या पोषणतत्त्वामुळे मदत मिळते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT