Mobile Cancer Threat eSakal
आरोग्य

Mobile Cancer Threat : 'या' कंपन्यांचे फोन वापरल्याने वाढू शकतो कॅन्सरचा धोका; रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती!

Smartphone SAR Value : तुमच्या फोनमधून किती रेडिएशन उत्सर्जन होतं हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता.

Sudesh

मोबाईल फोन ही आज एक गरज झाली असली, तरीही त्याचा अतिवापर धोकादायक आहे. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. यामध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचाही समावेश आहे.

डब्ल्यूएचओचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने देखील मोबाईलमधून निघणाऱ्या RF रेडिएशनबाबत इशारा दिला आहे. या रेडिएशनमुळे मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, असं WHO ने म्हटलं आहे. अमेरिकेच्या कॅन्सर सोसायटीने देखील असाच इशारा दिला आहे.

कोणत्या फोनचा सर्वाधिक धोका

जर्मन फेडरल ऑफिस फॉर डेटा प्रोटेक्शन या संस्थेने २०१८ साली एक यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये कित्येक नव्या आणि जुन्या स्मार्टफोनमधून निघणाऱ्या रेडिएशनबद्दल माहिती देण्यात आली आहे. याबाबत बीबीसी या वृत्तसंस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सर्वाधिक रेडिएशन उत्सर्जित करणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वन प्लस, हुआवी आणि नोकिया लुमिया या कंपन्या टॉप तीन आहे. तर यात आयफोन-७ हा दहाव्या क्रमांकावर आहे.

कोणते फोन सुरक्षित?

या यादीमध्ये सर्वात कमी रेडिएशन उत्सर्जित करणारे फोनही सांगितले आहेत. यात सोनी एक्सपीरिया एम ५, सॅमसंग गॅलेक्सी नोट ८, गुगल प्लस एक्सएल, सॅमसंग गॅलेक्सी एस ८, एस ७ एज्ड, एस ६ एड्ज प्लस आणि मोटोरोलाच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे.

अशी तपासा SAR व्हॅल्यू

तुमच्या फोनमधून किती रेडिएशन उत्सर्जन होतं हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. यासाठी तुम्हाला डाएल पॅड उघडून त्यावर *#07# असं टाईप करायचं आहे. यानंतर तुमच्या फोनची SAR व्हॅल्यू डिस्प्लेवर दिसेल. भारतात आणि अमेरिकेत जास्तीत जास्त 1.6W/Kg एवढी सार व्हॅल्यू निश्चित करण्यात आली आहे. यापेक्षा कमी व्हॅल्यू असल्यास तुमचा फोन सुरक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Controversy : शनिवारवाड्याच्या वादावरून रूपाली ठोंबरेंचा खासदार मेधा कुलकर्णींसह पोलिसांना मोठा इशारा, म्हणाल्या...

Rohit Sharma विरुद्ध मिचेल स्टार्कने खरंच 176.5 Kmph वेगात बॉल टाकला? जाणून घ्या सत्य काय

Diwali 2025: दिवाळीत कमी वेळेत काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या, एका क्लिकवर पाहा खास रांगोळी डिझाइन्स

Mokhada Rain Damage : परतीचा पाऊस ही ऊठला शेतकर्याच्या मुळावर, मोखाड्यात कापणीला आलेले भात शेतातच आडवे

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या

SCROLL FOR NEXT