Monsoon Remedies  esakal
आरोग्य

Monsoon Remedies : पावासाळ्यात डेंग्यू आणि मलेरियापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी घरीच बनवा या औषधी

या ऋतूमध्ये डास चावल्याने डेंग्यू, मलेरियासारखे घातक आजारही होतात, ज्यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो

साक्षी राऊत

Monsoon Remedies : मान्सून आला की डासांचा प्रादूर्भाव वाढतो. देशभरात सगळीकडेच जवळपास मान्सूनचे आगमन झाले आहे. सुमारे 3 महिने चालणारा हा ऋतू डास आणि माशांच्या उत्पत्तीसाठी पोषक असतो. या ऋतूमध्ये डास चावल्याने डेंग्यू, मलेरियासारखे घातक आजारही होतात, ज्यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

तेव्हा वेळीच सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 घरगुती औषधी बनवण्याच्या उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यापासून तुम्ही घरीच औषधी बनवू शकता.

कडूलिंबाची पानं

डेंग्यू मलेरियावर घरगुती उपचार करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे. या पानांमध्ये विषाणू आणि जीवाणू मारण्याची शक्ती असते. या पानांच्या सेवनाने मलेरिया, अति ताप, डेंग्यू, फ्लू असे अनेक आजार बरे होतात.

दालचिनीचा काढा

डेंग्यू मलेरियाच्या रूग्णाला दालचिनीचा काढा देणे हा आयुर्वेदात तापावर उत्तम औषध मानले जाते. जर तुम्हाला हा काढा कडू वाटत असेल तर तुम्ही त्यात मध घालून तो पिऊ शकता.

Monsoon Remedies

आल्याचा रस

आयुर्वेद तज्ञांच्या मते, जास्त ताप आल्यास तुम्ही आल्याचा रस देखील पिऊ शकता. डेंग्यू मलेरियावर हा उत्तम घरगुती उपचार आहे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच शिवाय ताप आणणारे विषाणूही संपतात.

गिलोयचा काढा

डेंग्यू मलेरियापासून बचाव करण्यासाठी गिलॉयच्या काढ्याचे सेवन तुम्ही करू शकता. यात अँटी-पायरेटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे डेंग्यू-मलेरियाच्या बाबतीत ते खूप फायदेशीर ठरते. याच्या वापराने वारंवार ताप येत नाही. (Dengue)

तुळशीच्या पानांचा रस

तुळशीला आयुर्वेदिक गुणधर्मांची खाण म्हणतात. त्याच्या पानांमध्ये डायफोरेटिक आणि अँटीपायरेटिक गुणधर्म असतात. याच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील घाम वेगाने बाहेर पडतो, त्यामुळे शरीराचे वाढलेले तापमान कमी होऊन ताप कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT