Monsoon Tips  esakal
आरोग्य

Monsoon Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं टाळा, वाढेल आरोग्याच्या समस्या

पावसाळ्यात भाज्या निवडतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. काही भाज्या पावसाळ्यात टाळणे कधीही चांगले.

साक्षी राऊत

Monsoon : ज्या ऋतूची सगळ्यांना वाट होती तो म्हणजे पावसाळा. पाऊस पडताच मात्र वातावरणात बदल होतात. तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात भाज्या निवडतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. काही भाज्या पावसाळ्यात टाळणे कधीही चांगले.

पावसाळा आला की साथीचे आजार वाढतात. हे आजार वाढण्यामागे बदलते वातावरण, भाज्यांवरील किटक, वातावरणातील विषाणू असे बरेच घटक कारणीभूत असू शकतात.

तेव्हा पावसाळा आला की काही भाज्या खाणे टाळले पाहिजे. कारण बहुतेक भाज्यांमध्ये पावसाळा आला की किडे आणि अळ्या पडायला सुरुवात होते.

पालक, मेथी, शेपू या भाज्यांमध्ये पावसाळ्यात हिरव्या अळ्या पडतात. भाज्यांचाही रंग हिरवा असल्याने भाज्यांमधील अळ्या सहसा दिसत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाणे टाळलेच पाहिजे. (Health)

हिरव्या पालेभाज्यांव्यतिरिक्त कोबी आणि फ्लॉवर खाणं देखील पावसाळ्यात टाळलं पाहिजे. कारण पावसाळ्यात बहुतांश भाज्यांमध्ये अळ्या पडायला सुरुवात होते.

पावसाळ्यात मशरून खाणंदेखील टाळावं.पावसाळ्यात मशरूम खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्याने इलटी, पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात. (Monsoon)

पावसाळ्यात शिमला मिर्ची खाणंदेखील टाळलं पाहिजे. पावसाळा सुरु झाला की शिमला मिर्चीत अळ्या पडायला सुरुवात होते.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT