How To Protect Family From Dengue At Home: डेंग्यू हा एक गंभीर आजार असून तो एडीज एजिप्टी जातीच्या डासांच्या चाव्यामुळे होतो. यामुळे ताप, अंगदुखी आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसतात. त्यामुळे या आजारापासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी १६ मे रोजी 'राष्ट्रीय डेंग्यू दिन' साजरा केला जातो, ज्याची सुरुवात २०१० मध्ये भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केली. यावर्षीची या दिवसाची थीम आहे, "लवकर पावलं उचला, डेंग्यू थांबवा: स्वच्छ परिसर, निरोगी आयुष्य".
डेंग्यू टाळण्यासाठी डासांचा नायनाट करणे आणि हे डास आपल्या आसपासच्या परिसरात झाल्यास आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. खाली काही घरगुती उपाय दिले आहेत, जे तुमच्या घरात डासांचा प्रवेश होऊ देणार नाहीत.
कापूर जाळा
कापूर हा आपल्या घरात सहज मिळतो. रोज संध्याकाळी १०-१५ मिनिटं घर बंद करून कापूर जाळा. त्याचा धूर डासांना सहन होत नाही आणि ते पळून जातात. किंवा, पाण्यात कापूर भिजवून ठेवा आणि ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून खोलीत फवारा यामुळे डास घरात येणारच नाहीत.
लिंबू आणि लवंग
एक लिंबू अर्धवट कापून त्यात काही लवंगा खोचा आणि ते खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. याच्या वास डासांना सहन होत नाही आणि ते त्या ठिकाणाहून लांब राहतात. यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे हवा शुद्ध होते आणि डास लांब पळतात.
कडुलिंबाच्या तेलाचा वापर
कडुलिंबाचं तेल हे नैसर्गिक कीटकनाशक आहे. थोडं तेल पाण्यात मिसळून त्या मिश्रणाची फवारणी केल्यास डास जवळ येत नाहीत. नारळ तेल व लॅव्हेंडर ऑईल मिसळल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो.
लसुण
लसूण हा डासांना दूर ठेवण्यासाठी एक दमदार घरगुती उपाय आहे. त्यासाठी काही लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्या चांगल्या ठेचून घ्या. मग त्यात थोडं पाण्यात टाका आणि नीट मिसळा. हे पाणी सुमारे एक तास तसंच ठेवून द्या. नंतर हे पाणी घरात जिथे डास जास्त असतात तिथे फवारा. काही वेळात डास गायब होतील.
मच्छरदाणीचा वापर करा
रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर केल्यास डास चावण्याची शक्यता बरीच कमी होते. दिवसा देखील तुम्ही विश्रांती घेत असाल तर तेव्हा देखील मच्छरदाणीचा वापर केल्यास जास्त सुरक्षितता मिळत
डेंग्यूपासून वाचायचं असेल तर फक्त औषधांवर अवलंबून न राहता घरात स्वच्छता राखणे, ठिक ठिकाणी पाणी साचू न देणे, घरातील न लागणाऱ्या किंवा भंगारच्या वस्तू वेळीच काढून टाकणे आणि वरील घरगुती उपाय वापरणे गरजेचे आहे. आरोग्यदायी आणि डासमुक्त वातावरणच डेंग्यू रोखण्यासाठी सर्वात प्रभावी ठरू शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.