Eggs Eating Tips sakal
आरोग्य

Eggs Eating Tips : अंड्यासोबत 'या' पाच गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

जाणून घ्या त्या पाच गोष्टी कोणत्या?

सकाळ डिजिटल टीम

अंड्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला अंडी खाण्याचा सल्ला देतात की रोज एक अंडी खावी. विशेषत: हिवाळ्यात आवर्जून आपण अंडी खायला हवी. अंड्यात असलेली प्रथिने तुमची हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

अंड्याचे सेवन करताना आपण काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. आपण अनेकदा अंड्यासोबत काहीही खातो पण कधी कधी काही कॉम्बिनेशन जीवघेणेसुद्धा असतात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांसह अंडी कधीही खाऊ नये हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (never eat these things with eggs read story)

भाजलेलं मांस आणि अंडी
अनेक ठिकाणी अंडी आणि भाजलेले मांस आपण एकत्र खातो. पण असं चुकूनही करु नये कारण भाजलेल्या मांसात आणि अंडीमध्ये भरपूर प्रथिने आणि फॅट असते, जे आपल्या सुस्तीचे कारण बनते.

सोया आणि अंडी
अंड्यांसह सोया चुकूनही खाऊ नका. यामुळे आपल्या बॉडीमधील प्रोटीन्स शोषून घेण्याची क्षमता कमी होते. विशेषत: जिममध्ये जाणारे लोक अंड्यांसह सोया दूध पितात. त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

चहा आणि अंडी
आपल्याला सकाळी नाश्तात अंडी खायची सवय असते. पण चुकूनही चहासोबत अंडी खाऊ नये. असे केल्यास तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

दुधाच्या वस्तू आणि अंडी
दुध किंवा दूधाच्या वस्तूंसोबत चुकूनही अंडी खावी नाही. विशेषत: चीज, दूध किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत अंडी खाणे टाळावे.

साखर आणि अंडी
जर तुम्ही साखरेसोबत अंडी खात असाल तर आजच थांबवा. जेव्हा आपण साखर आणि अंडी एकत्र शिजवतो तेव्हा तेव्हा अमिनो अॅसिड तयार होते जे शरिरासाठी हानिकारक आहे. विशेष म्हणजे त्यामुळे ब्लड क्लॉटींग होण्याची दाट शक्यता असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT