New Mom Sleep Importance esakal
आरोग्य

New Mom Sleep Importance : नवीन मातांमध्ये झोपेची कमतरता? काळजी घ्या अन्यथा 'हा' धोका मोठा, अभ्यासातून आलं समोर

नवीन मातांमध्ये झोपेची कमतरता ही फार सामान्य गोष्ट समजली जाते. पण याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

धनश्री भावसार-बगाडे

Less Sleep In New Motherhood Side Effects In Marathi :

बाई गं, आधीच झोपून घे. एकदा मुल झालं की, झोपं विसरायची... असे सल्ले आपल्याकडे सर्रास दिले जातात. यात मातेला झोप मिळत नाही ही गोष्ट फार सामान्य समजली जाते हे तर स्पष्टच. पण ही बाब त्या नव मातेसाठी किती घातक आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.

नवीन मातांना पुरेशी झोप गरजेची आहे, नाहीतर नैराश्यासारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते असे अभ्यासातून समोर आले आहे.

बाळंतपण आणि त्यांच्या शरीरात होणार्‍या बदलांशी झगडणार्‍या नवीन मातांना अनेक महिन्यांच्या तुटलेल्या झोपेचा सामना करावा लागतो. अनेक नवीन माता बाळाच्या जन्मानंतर, स्तनपान करण्याचा आणि त्यांच्या शरीरातील बदलांचा सामना करण्याचा प्रयत्न करतात. इतकेच नाही तर त्यांना अनेक महिन्यांच्या तुटलेल्या झोपेचा सामना करावा लागतो, हे सर्व एका लहान जीवाची काळजी घेत असताना.

द. हिंदूमधील वृत्तानुसार स्लीप जर्नलमध्ये प्रकाशित 2019 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की नवीन पालकांना सहा वर्षांपर्यंत झोपेची कमतरता जाणवू शकते. आणि यात आश्चर्य नाही की कमी झोपेचा सामना पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त करावा लागतो.

या जानेवारीत, बीएमसी सायकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या मातांना थकवा जास्त आहे, झोपेची गुणवत्ता कमी आहे आणि लवचिकता कमी आहे, त्यांना प्रसूतीपश्चात नैराश्य होण्याचा धोका जास्त आहे.

या गंभीर जोखमीच्या व्यतिरिक्त, तुटलेल्या झोपेमुळे नवीन मातांमध्ये चिंता, चिडचिड, कमी एकाग्रता आणि थकवा दिवसभरात वाढू शकतो, असे चेन्नईच्या निथ्रा स्लीप इन्स्टिट्यूटचे संचालक एन. रामकृष्णन यांनी सांगितले.

"मातेला किमान दिवसा तरी पूर्ण झोप मिळावी अशी सपोर्ट सिस्टीम तयार करायला हवी. बहुतेक मातांना दिवसा झोपणे कठीण जाते ते बाळ झोपल्यावर झोप काढतात. पण ज्यांना यापैकी काहीही करणे शक्य होत नाही, आणि आपण याच्याशी सामना करू शकत नाही असं वाटत असेल तर त्यांनी मदत घ्यावी" असं, डॉ. रामकृष्णन यांनी सांगितलं.

वेगवेगळ्या वयोगटांना वेगवेगळ्या प्रमाणात झोपेची गरज असते हे मान्य करताना, स्लीप फाउंडेशन शिफारस करते की बहुतेक निरोगी प्रौढांना प्रत्येक रात्री किमान सात तास झोपेची आवश्यकता असते, तर शिशू, लहान मुले आणि किशोरवयीनांनी वाढीसाठी आणि अधिक विकास मिळविण्यासाठी झोपण्याची आवश्यकता असते.

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने हजारो हायस्टडीजचा अभ्यास करण्यासाठी झोपेच्या तज्ज्ञांचे एक पॅनल निश्चित केले आहे. ते झोपेचा कालावधी आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, नैराश्य, वेदना आणि मधुमेह यासारख्या मुख्य आरोग्य परिणामांबद्दल अभ्यास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT