Nipah Virus esakal
आरोग्य

Nipah Virus : निपाह व्हायरसचा धोका वाढला.! पण हा व्हायरस नेमका काय आहे? जाणून घ्या लक्षणे

Nipah Virus : निपाह हा एक प्रकारचा धोकादायक विषाणू आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Nipah Virus : निपाह व्हायरसने सध्या केरळची डोकेदुखी वाढवली आहे. कारण, केरळमध्ये नुकत्याच एका १४ वर्षीय मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या मुलावर सध्या कोझिकोडे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून केरळ सरकार सक्रिय झाले आहे.

मागील काही वर्षांमध्ये केरळ राज्यात निपाहच्या संसर्गाने काही जणांना मृत्यू झाला होता. त्यामुळे, आता पुन्हा या व्हायरसने डोके वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. हा निपाह व्हायरस नेमका काय आहे? तो कुठे आढळतो? आणि त्याची लक्षणे काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

निपाह व्हायरस नेमका काय आहे?

निपाह हा एक प्रकारचा धोकादायक विषाणू आहे. हा विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. त्यामुळेच, या विषाणूला झुनोटिक व्हायरस असे ही म्हटले जाते. हा व्हायरस प्रामुख्याने वटवाघळांमुळे पसरतो. ज्यामुळे, त्याला फ्लाईंग फॉक्स म्हटले जाते.

परंतु, वटवाघळांव्यतिरिक्त हा विषाणू डुक्कर, बकरी, घोडा, कुत्रा किंवा मांजर यांसारख्या इतर प्राण्यांमधून पसरण्याची देखील शक्यता असते. निपाह व्हायरस हा सामान्यत:  संक्रमित प्राण्यांच्या शरीरातील द्रव जसे की, रक्त, विष्ठा, मूत्र किंवा लाळ यांच्या संपर्कातून पसरतो.

निपाह व्हायरस कुठे आढळतो?

साधारणपणे प्रत्येक वर्षी निपाह व्हायरसचा उद्रेक हा आशियातील काही देशांमध्ये आढळून येतो. प्रामुख्याने बांगलादेश आणि भारतामध्ये हा निपाह व्हायरस आढळून येतो. १९९९ मध्ये पहिल्यांदाच या विषाणूचा शोध लागला होता.

त्यावेळी मलेशिया आणि सिंगापूरमध्ये या विषाणूमुळे तब्बल १०० लोकांचा मृत्यू झाला होता. भारता व्यतिरिक्त हा विषाणू बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि थायलंड इत्यादी देशांमध्ये आढळतो.

निपाह व्हायरसची लक्षणे कोणती?

निपाह व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर साधारणपणे ४ ते १४ दिवसांमध्ये व्यक्तीमध्ये लक्षणे दिसू लागतात. सुरूवातीला ताप किवा डोकेदुखी आणि त्यानंतर, खोकला सुरू होतो. तसेच, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या निर्माण होतात. निपाह व्हायरसची लागण झाल्यानंतर, सुरूवातीच्या टप्प्यात खालील लक्षणांचा समावेश असू शकतो.

  • ताप

  • डोकेदुखी

  • श्वास घेण्यास अडचण येणे

  • खोकला

  • घसा खवखवणे

  • उलट्या

  • अतिसार

  • स्नायूंमध्ये वेदना होणे

  • अशक्तपणा जाणवणे

काही गंभीर प्रकरणांमध्ये या निपाह विषाणूमुळे मेंदूमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. जो अधिक प्राणघातक ठरू शकतो. अशा गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्तीमध्ये खालील लक्षणे दिसतात.

  • बोलण्यास अडचण येणे

  • बेशुद्ध होणे

  • झटके येणे

  • श्वसनाच्या समस्या निर्माण होणे

  • संभ्रम होणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Marbat Festival 2025 : देशातील मारबत मिरवणारे एकमेव शहर नागपूर! काय आहे मारबत परंपरा?

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT