Nose Picking Sakal
आरोग्य

Nose Picking : नाकात बोटं घातल्याने होतो अल्झायमर? वाचा, काय सांगते स्टडी

चारचौघांमध्ये अशाप्रकारे नाकात बोट घालणे बघण्यास अतिशय विचित्र वाटते.

सकाळ डिजिटल टीम

Nose Picking : तुम्ही अनेकदा लोकांना नाकात बोट घालताना पाहिले असेल. काही लोक हे कृत्य निर्जन ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी कुणी नाहीये अशा ठिकाणी करतात. तर, काही समोर कुणीही असले तरी, थेट नाकात बोट घालून स्वच्छतेचे काम सुरू करतात.

हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

चारचौघांमध्ये अशाप्रकारे नाकात बोट घालणे बघण्यास अतिशय विचित्र वाटते. मात्र, नाकात बोटं घालण्याची ही सवय तुम्हाला आजारी पाडण्यास कारणीभूत ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला नाकात बोटं घातल्याने नेमका कोणता गंभीर आजार होतो याबद्दल सांगणार आहोत.

ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठात संशोधकांनी एका उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, क्लॅमिडीया न्यूमोनिया नावाचा जीवाणू नाकातून बोटाद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. बॅक्टेरियामुळे मेंदूमध्ये बदल होत असल्याचेही या अभ्यासातून समोर आले. जे अल्झायमरचे लक्षण असल्याचे संशोधकांचे मत आहे.

उंदरावर दिसून आलेले लक्षणांपेक्षा याचे परिणाम अधिक भयावय असू शकतात. नाकात बोट घालणे किंवा नाकातील केसं तोडणं आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. असे केल्याने नाकातील लेअर खराब होऊन नाकावाटे मेंदूमध्ये जीवाणू जाण्याचा धोका वाढतो. याशिवाय या सवयीमुळे वास घेण्याची शक्तीदेखील कमी होण्याचा धोका आहे. अल्झायमरचे प्रारंभिक लक्षण म्हणजे वासाची क्षमता कमी होणे हेच आहे.

अल्झायमरची लक्षणं काय?

  • साधी-साधी कामं पूर्ण करण्यात अडचणी येणं.

  • समस्या सोडवण्यात अडचणी.

  • व्यक्तिमत्व बदलणे, स्वतःला इतरांपासून वेगळे करणे.

  • लोक, ठिकाणं आणि घटनांबद्दल भ्रम निर्माण होणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT