दातांची काळजी
दातांची काळजी Esakal
आरोग्य

Dental Care न घेतल्यास होवू शकतात गंभीर आजार 

Kirti Wadkar

अनेकजण आरोग्याची काळजी घेत असताना दातांच्या आरोग्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करतात. केवळ एखादा दाताचा त्रास झाल्यावरच अनेकजण डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातात. मात्र दांतीची आणि संपूर्ण तोडांची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमची ओरल हेल्द चांगली असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. Not Taking oral health will lead to many diseases marathi health tips

तोंडाची आणि दातांची योग्य काळजी Oral Health घेतल्यास बॅक्टेरिया शरीराच्या आत जात नाही. ओरल हेल्थकडे लक्ष न दिल्यास आरोग्याच्या Health इतर समस्या देखील निर्माण होवू शकतात. ओलर हेल्दकडे दुर्लक्ष केल्यास न्युमोनिया होण्याची शक्यता देखील बळावते. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल मात्र अभ्यासानुसार दातांची स्वच्छता राखल्यास हृदय आणि मानसिक रोगांची जोखीम कमी होते. संशोधनानुसार जे लोक नियमित दात स्वच्छ ठेवत नाहीत त्यांना दात किडणे आणि हिरड्यांच्या समस्यांसोबतच हृदयरोग आणि स्मृतिभ्रंशासारख्या मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

हिरड्यांचे आजार

दातांची किंवा तोंडाच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास हिरड्यांमध्ये किंवा दातांच्या आजूबाजूच्या हाडांमध्ये संसर्ग आणि जळजळ होते ज्यामुळे पीरियडॉन्टायटिस म्हणजेच हिरड्यांचे आजार होतात. या संसर्गामुळे हिरड्यांची दातांवरील पकड कमी होते आणि त्यामुळे दात वेळेआधी लवकर पडण्याची समस्या निर्माण होते. 

हे देखिल वाचा-

न्युमोनिया होण्याची शक्यता

तोंडाची नियमित आणि योग्य प्रकारे स्वच्छता तशीच काळजी न घेतल्यास तोडांत जंतूंचं प्रमाण वाढतं. हे जंतू तोंडात आल्यावर शरीराच्या श्वसनसंस्थेत प्रवेश करतात. यानंतर हे जंतू दुप्पट संस्खेने वाढतात आणि  झोपेच्या वेळी फुफ्फुसात प्रवेश करतात. यामुळे सूक्ष्मजंतू तयार होतात आणि निमोनिया होण्याची शक्यता निर्माण होते. वैद्यकिय तज्ञांच्या मते कोणत्याही संसर्गामुळे फुफ्फुसात सूज आल्यास त्याला निमोनिया म्हणातात. लहान मुलं आणि वयोवृद्धांमध्ये निमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. 

अशी घ्या काळजी

ओरल हेल्दची काळजी घेण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करणं गरजेचं आहे. ब्रशचे ब्रिस्टल सॉफ्ट असावे. ब्रश घाईगडबडीत न करता पूर्ण २ मिनिटं करावं. जर ब्रशचे ब्रिस्टल खराब होवू लागले तर लगेचच ब्रश बदलावा. दर ६ महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन दातांची नक्की तपासणी करावी. तसचं जास्त गोड खाणं टाळावं. 

दातांच्या समस्यांमुळे हृदय रोग

एका संशोधनात असं आढळून आलंय की तोंडांची खास करून दातांची स्वच्छता न ठेवल्याने हदय विकार होण्याची जोखिम वाढते. यासंबधी यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डियोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधाभ्यासानुसार जे लोक दिवसातून तीनदा ब्रश करतात म्हणजेच दात स्वच्छ करतात त्यांच्याच एट्रियल फाइब्रिलेशन आणि हार्ट फेलियर सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी असतो.

या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी  दिवसातून दोनदा तरी ब्रश करा. जेवल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर गुळण्या करा. आठवड्यातून एकदा ऑईल पुलिंग करा. म्हणजेच तेलाच्या गुळण्या करा. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहण्यास मदत होते. गोड पदार्थ कमी प्रमाणात खा. यामुळे तोंड आणि दात निरोगी राहण्यास मदत होईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT