OCD and you health tips blood test precaution  Sakal
आरोग्य

ओसीडी आणि आपण

उच्चशिक्षित असलेला आनंद ब्लड टेस्ट करून घ्यायला घाबरतो. त्याच्या मनात एचआयव्ही होण्याची भीती वाटते.

सकाळ वृत्तसेवा

उच्चशिक्षित असलेला आनंद ब्लड टेस्ट करून घ्यायला घाबरतो. त्याच्या मनात एचआयव्ही होण्याची भीती वाटते. त्याला वाटतं, कदाचित आपल्या आधी ज्या व्यक्तीचं रक्त घेतलं गेलं होतं, तीच सिरींज तर आपल्यासाठी वापरली नसेल? त्याला गर्दीतून चालण्याची भीती वाटते. न जाणो एखाद्याच्या उघड्या जखमेचा स्पर्श आपल्याला होईल आणि आपल्याला संसर्ग होईल. त्याला बाहेर वडापाव खायचीही भीती वाटते.

न जाणो तिथल्या कांदा कापणाऱ्या व्यक्तीला खरचटलं असेल आणि ते रक्त कांद्यातून आपल्या शरीरात गेलं, तर आपल्याला इन्फेक्शन होईल. वास्तविक आत्ता सांगितलेल्या कुठल्याही कारणातून त्याला एचआयव्ही इन्फेक्शन होऊ शकणार नाही.

इन्फेक्शन होण्याची कारणं वेगळी आहेत हे त्याला पूर्ण माहिती आहे, तरी त्याला अशा प्रकारची भीती वाटत राहते. मग तो मनात कसला तरी मंत्र म्हणतो. तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. हे केलं, की तो स्वस्थ होतो; पण हा मंत्रचळ त्याला पूर्ण करावाच लागतो.

श्रीमती जोशी दरवाज्याला किंवा गाडीला कुलूप लावल्यानंतर ते नीट लागलंय की नाही हे खूप वेळ तपासत राहतात. अजयला सतत आपल्याला जंतुसंसर्ग होईल, याची भीती वाटत असते, म्हणून तो वारंवार हात धूत असतो.

अस्वस्थ असतो. संदीप देवाला सारखा नमस्कार करीत राहतो. संंकेत गाडी बरोबर पार्क झाली आहे की नाही ते अनेकदा तपासत गाडी पुढे-मागे करतो. आदित्यला रस्त्यानं जाताना वाहनांच्या नंबरप्लेटमधल्या आकड्यांची बेरीज करत राहायची सवय आहे. एखादं जरी वाहन चुकलं, तरी तो अस्वस्थ होतो. 

ही सगळी ओसीडीची (obsessive compulsive disorder) (साध्या शब्दांत - छळवादी विचार आणि निरर्थक मंत्रचळ लागल्यासारखी एकच कृती पुनःपुन्हा करणे) लक्षणे असू शकतात. या आजारात नको असणारे, निरर्थक,

तर्काला न पटणारे विचार, प्रतिमा इत्यादी पुनःपुन्हा व्यक्तीच्या मनात येतात (obsession) आणि मग अशी व्यक्ती या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेतून सुटका होण्यासाठी त्या विचारांशी निगडित कृती पुनःपुन्हा करत राहते (compulsion). उदाहरणार्थ, बाहेरून घरात आलेल्या एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, की आपल्याला जंतुसंसर्ग होईल, तर त्या भीतीतून मुक्ततेसाठी ती व्यक्ती पुनःपुन्हा हात धूत राहते.

जोपर्यंत हात स्वछ झाले आहेत असं त्या व्यक्तीचं समाधान होत नाही, तोपर्यंत हे चालूच राहतं. ओसीडी हा अस्वस्थतेचा आजार आहे. बऱ्याच वेळा तो इतर मानसिक आजारांबरोबरसुद्धा (co-morbidity) असू शकतो. मेंदूतील न्युरोकेमिकल्सबाबतचं असंतुलन (विशेषत: serotonin इत्यादी), अनुवंशिकता इत्यादी गोष्टी कारणीभूत असू शकतात.

ओसीडीग्रस्त व्यक्ती अनेक प्रकारांपैकी बहुदा पुढीलपैकी एका प्रकारात मोडते :

Washers (पुनःपुन्हा हात धुणारे) : यांना नेहमी जंतुसंसर्गाची भीती वाटत असते त्यामुळे समाधान होईपर्यंत ते हात पहाःपुन्हा धूत राहतात.

Checkers (पुनःपुन्हा तपासणारे) : दाराचं किंवा गाडीचं कुलूप नीट लागलंय की नाही, हे पुनःपुन्हा तपासत राहतात. हे केलं नाही तर काहीतरी जबरदस्त धोका किंवा इजा होईल अशी त्यांनी धारणा करून घेतलेली असते.

Doubters and Sinners (संशयी आणि पाप भावना) : यांना प्रत्येक गोष्ट अतिव्यवस्थित लागते. तशी ती नसेल तर जबरदस्त शिक्षा होईल अशी भीती मनात असते.

Counters and arrangers (अकारण आकडे मोजणं, त्यांची बेरीज करणं वगैरे) : यांना विशिष्ट आकडा, वस्तू, रचना, रंग इत्यादीविषयी अंधश्रद्धा असतात.

Hoarders (जुन्या, निरुपयोगी वस्तू साठवणारे) : यांना भीती असते, की साठवलेल्या (विनाकारण) गोष्टी फेकून दिल्या, तर काहीतरी शिक्षा घडेल.

काहीवेळा कुणाच्याही मनात कधीतरी obsessive, छळवादी विचार येतात किंवा हातून क्वचित compulsive कृत्ये घडतात; पण म्हणून ती व्यक्ती ओसीडीग्रस्त आहे असं नव्हे. अशा व्यक्तींचं वागणं थोडं विचित्र असतं (compulsive या अर्थानं), त्यात तर्कसंगती नसते; पण अशी व्यक्ती दैनंदिन जीवन विनाअडथळा जगू शकते.

या उलट ओसीडीग्रस्त व्यक्तीचा बराचसा वेळ ओसीडीचे विचार आणि वर्तन यांमध्ये जातो. त्यांना अस्वस्थतेचा इतका त्रास होतो, की दैनंदिन जीवन जगणं कठीण होऊन जातं. ओसीडीची लक्षणं काळानुसार कमी-जास्त होतात; तसंच ताण-तणावाच्या वेळेस अधिक तीव्र होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT