Office Yoga esakal
आरोग्य

Office Yoga : बैठ्या कामामुळे पोटात गॅस होतोय? हे आसन पोटाचा विकारांतून करेल मुक्त

दिसवसभर बसून काम केल्याने हालचाल कमी होते आणि इतर अनेक समस्या निर्माण होतात.

धनश्री भावसार-बगाडे

Office Yoga Kokilasan : तासन् तास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने हालचाल कमी होते. शरीराला व्यायाम न मिळाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. पण जर स्वतःसाठी थोडासा वेळ काढून काही आसनं केली तर बऱ्याचशा समस्यांतून सहज आराम मिळू शकतो.

पोटात गॅस होणे, वाताचे त्रास वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होतात पण यावर उपाय म्हणून नियमित कोकिळासन केले तर आराम मिळू शकेल.

कोकिळासन हे एक तोलात्मक आसन आहे.

असे करा आसन

  • प्रथम पाय समोर करून ताठ बसावे व पद्‍मासन घालावे.

  • त्यानंतर हात थोडेसे बाजूला जमिनीवर टेकवून हाताकडचा जोर थोडासा वाढवून पद्मासनाचा मांडीवरचा भाग जमिनीपासून वर उचलावा.

  • दोन्ही मांड्या (पद्‍मासन) घडी घातल्याप्रमाणे पोटाच्या दिशेला घ्याव्यात.

  • त्यानंतर छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे दोन्ही हातांचा नमस्कार करून हाताचे कोपरेही जुळवून घ्यावेत.

  • कोपर व दंडाची पद्‍मासनाची स्थिती धरून ठेवावी.

  • शरीराचा संपूर्ण भार छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे सीटवर सांभाळावा. श्‍वसन संथ सुरू व नजर स्थिर असावी.

आसनाचे फायदे

  • नियमित सरावाने एकाग्रता, आत्मविश्‍वास वाढतो.

  • पोटावर दाब येतो व त्यामुळे पोटातील इंद्रिये अधिक कार्यक्षम होतात.

  • वाताचा त्रास कमी होतो.

  • मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन जरूर करावे.

  • ही काळजी घ्या

  • गुडघ्याचा त्रास असणाऱ्यांनी पद्मासन घालू नये..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT