Organ Donation
Organ Donation esakal
आरोग्य

Organ Donation : मृत्यूनंतरही क्रितीची किर्ती जगभर पसरली, १४ वर्षाच्या पोरीने १० जणांना दिल जीवनदान!

धनश्री भावसार-बगाडे

14 Year Girl Gave Lives To Other 10 People : हसमुख, खेळकर, अल्लड १४ वर्षांची क्रिती जैन खेळताना चौथ्या मजल्यावरून पडली अन् तिच्या डोक्याला मार लागला. आई-वडिलांनी तिला ताबडतोब दवाखान्यात नेले. तिच्यावर उपचार सुरू झाले. पण डॉक्टरांच्या शर्थीला अपयश आले. तिचा ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

उद्योगपती वीरेंद्र कुमार जैन आणि पत्नी मोनिका वीरेंद्र कुमार जैन यांची क्रिती ही एकुलती एक मुलगी होती. शोकाकुल कुटुंबाने तिचे अवयव दान करून तिच्या आठवणी जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. क्रितीची फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, हृदयाच्या झडपा आणि कॉर्नियाची यशस्वीपणे कापणी आणि प्रत्यारोपण करण्यात आले, ज्यामुळे 10 लोकांना नवीन जीवन मिळाले.

तिचे वडिल वीरेंद्र यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, "क्रिती एक आनंदी आणि उत्साही मुलगी होती, ती घरची लाडकी होती आणि सर्वांचे तिच्यावर खूप प्रेम होते. ती खूप उत्साही आणि मजा करणारी होती. जेव्हा कधी मी अस्वस्थ किंवा काळजीत असायची तेव्हा ती मला सांगायची, 'पप्पा, स्माईल प्लिज. ती माझ्या खोड्या काढायची आणि मला हसवायची,"

क्रिती बाल्डविन गर्ल्स हायस्कूलची आठवीची विद्यार्थिनी होती. कृती अभ्यासात चांगली होती. ती तिच्या वर्गातील टॉप 10 विद्यार्थ्यांपैकी एक होती.

तिच्या मृत्यूनंतर, वडिलांना आपल्या मुलीसाठी पहिली गोष्ट करायची होती ती म्हणजे तिचे अवयव दान. क्रितीला गमावल्यानंतर रुग्णालयात तिची आई मोनिकाने त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. अवयव दानाला काही वेळा २४ तास लागतात आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळाल्यावर, वडिल थोडे डळमळले, पुढे न जाण्याचा विचार केला. पण पत्नीने आग्रह धरला. ती म्हणाली किमान मला तरी क्रिती कुठेतरी आहे असे वाटू शकते," असं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT