Mental Health  esakal
आरोग्य

Mental Health : ओव्हरथिंकिंग करताय? मग, जाणून घ्या आरोग्यावर होणारे 'हे' दुष्परिणाम

ओव्हरथिंकिंग केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Mental Health : ओव्हरथिंकिंग म्हणजे कायं तर जे लोक जास्त प्रमाणात विचार करतात, त्याला ओव्हरथिंकिंग करणे असे म्हणतात. जास्त प्रमाणात विचार करणाऱ्या व्यक्ती या इतर सामान्य व्यक्तींच्या तुलनेत जास्त त्रासलेल्या आणि तणावाखाली असतात.

असे लोक मग, स्वत:ला जास्त मानसिक आजारी बनवतात. मात्र, अतिप्रमाणात विचार केल्यावर याचा फक्त तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर, तुमच्या शरीरावर ही याचा परिणाम दिसून येतो.

ओव्हरथिंकिंग केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. कोणत्या आहेत या समस्या? चला तर मग जाणून घेऊयात.

ओव्हरथिंकिंग केल्याने झोपेच्या समस्या

आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपले जागरण होते, आपल्याला लवकर झोप येत नाही. मात्र, जेव्हा आपण ओव्हरथिंकिंग करतो किंवा जास्त प्रमाणात विचार करतो, तेव्हा झोपेच्या समस्या निर्माण होतात.

अतिविचार केल्यामुळे झोप न येणे आणि सकाळी उठल्यानंतर मग थकवा, सुस्ती येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. परिणामी, तुमचे वजन देखील झपाट्याने वाटते.

रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो परिणाम

जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात विचार करता तेव्हा तुमच्या झोपेवर याचा परिणाम होतो. शिवाय, तणावाची स्थिती वाढते आणि यामुळे, शरीरात कॉर्टिसोल हार्मोन्सची पातळी अचानक वाढते.

ही पातळी वाढली की त्याचा आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे, रोगप्रतिकारक क्षमत कमकुवत होते. त्यामुळे, विविध प्रकारचे रोग, संसर्गजन्य आजार यांचा धोका निर्माण होतो.

पचनक्षमतेवर होतो नकारात्मक परिणाम

एखादी व्यक्ती जेव्हा जास्त प्रमाणात विचार करते तेव्हा तणावाची स्थिती निर्माण होते. ती व्यक्ती तणावाखाली जाते. जास्त ताण घेतल्याने त्या व्यक्तीच्या पचनक्रियेवर ही याचा परिणाम होतो.

कारण, यामुळे पोटातील रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. हे सर्व झाल्यामुळे, याचा पचनक्षमेतवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे, पोटाच्या समस्या निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Mumbai Metro: बेस्टनंतर मेट्रोचा पुढाकार! गणेशोत्‍सवात रेल्‍वे मध्यरात्रीपर्यंत धावणार; पहा वेळापत्रक

Ganesh Festival 2025 : धूप-अत्तराचा गंध, सोबतीला भक्तिभावाचा आनंद; गणेशोत्सवानिमित्त भाविकांकडून पूजा साहित्य संचाला विशेष मागणी

Crime News : नाशिकमध्ये गटबाजीचा राडा; माजी नगरसेवक उद्धव निमसेंसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalna Water Supply: लघुपाटबंधारे विभाग, मनपाच्या गोंधळाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ‘घाणेवाडी’च्या सुरक्षा भिंतीचे निखळले पिचिंग

SCROLL FOR NEXT