Respiratory Infections Linked to Pigeon Exposure: दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्याभोवती सध्या मोठा वाद सुरू आहे. १९३३ मध्ये सुंदर पाण्याच्या कारंज्यापासून सुरू झालेलं हे ठिकाण आता कबुतरखान्यात बदललं आहे. इथे येणाऱ्या कबुतरांच्या विष्ठेमुळे, पिसांमुळे आणि दाण्यांमुळे परिसरात घाण वाढली आहे.
अनेकांच्या मते, याचा आरोग्यावर परिणाम होत आहे, विशेषतः अॅलर्जी, श्वसनाचे त्रास आणि फुफ्फुसांचे आजार वाढत आहेत. स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक अडथळ्यात येते. या पार्श्वभूमीवर कबुतरखाना हटवण्याची कारवाई सुरू आहे. डॉक्टरांनीही मत मांडले असून अशा वातावरणामुळे काही लोकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे.
मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या फुफ्फुस विभाग आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केलं. त्यात कबुतरांच्या विष्टेमुळे माणसांच्या श्वसन क्रियेवर परिणाम होऊन अनेक विकार होऊ शकतात.
ज्यात हायपरसेंसिटिविटी न्यूमोनाइटिस होण्याची दाट शक्यता असते. विष्ठेतून तयार होणाऱ्या वायूमुळे रुग्णाची श्वसन क्रिया बंद होऊन रुग्ण कायमस्वरूपी ऑक्सिजन थेरपीवर जाऊ शकतो. इतकंच काय तर संबंधित रुग्णाला प्रसंगी फुफ्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकताही भासू शकते, असं म्हटलं गेलंय.
कबुतरांची विष्ठा हवेत मिसळते आणि श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर अॅलर्जीचे प्रमाण वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, अनेक रुग्णांमध्ये याआधी अॅलर्जीची कोणतीही लक्षणे नव्हती, परंतु कबुतरांच्या संपर्कात आल्यावर अॅलर्जी निर्माण झाली.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कबुतरांच्या विष्ठेमुळे हायपरसेंसिटिव्हिटी प्न्युमोनायटिस आणि अस्थमाच्या अटॅक्स मध्ये वाढ झाली आहे. तसेच कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनविकार आणि न्यूमोनियाच्या रुग्णयांमध्ये वाढ झाली आहे.
अस्थमा (दमा): श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घरघर होणे.
सर्दी (र्हिनायटिस): नाक वाहणे, शिंका येणे, नाकात खाज सुटणे.
सायनुसायटिस: नाक व सायनसमध्ये सूज येणे, डोकेदुखी.
त्वचेच्या ॲलर्जी: त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे.
कंजंक्टिव्हायटिस: डोळ्यांची सूज व जळजळ, डोळे लाल होणे.
डिविएटेड नोजल सेप्टम (विचलित अनुनासिक सेप्टम): जरी हा थेट ॲलर्जीमुळे होणारा आजार नसला तरी, सततच्या नाकाच्या ॲलर्जी आणि सूजेमुळे तो अधिक त्रासदायक होऊ शकतो.
कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसाला काही श्वसनाशी निगडित आजार होऊ शकतात. जसे की,
क्रिप्टोकोकोसिस (Cryptococcosis): हा एक बुरशीजन्य (Fungal, Bacterial Disease) आजार आहे, जो कबुतरांच्या विष्ठेमध्ये आढळून येतो.
हिस्टोप्लास्मोसिस (Histoplasmosis): क्रिप्टोकोकोसिस सारखाच हा देखील एक बुरशीजन्य आजार आहे. ही बुरशी कबुतरांच्या विष्ठेमध्ये वाढते आणि श्वासावाटे शरीरात शिरकाव करू शकते.
सिटाकोसिस (Psittacosis): हा एक बॅक्टरीयाजन्य आजार आहे, ज्याची कबुतरांच्या विष्ठेमधील धूळ शरीरात गेल्याने लागण होऊ शकते. यामुळे ताप, थंडी, संयु दुखणे, डोकेदुखी यासारखी फ्लूची लक्षणं दिसतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया होण्याची देखील शक्यता असते.
ॲलर्जी आणि अस्थमा (Allergy and Asthma): कबुतरांच्या विष्ठेतील आणि पिसांमधील घटकांमुळे ॲलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांना खाज सुटणे किंवा अस्थमा (दमा) चा त्रास वाढू शकतो. ज्या व्यक्तींना आधीपासून अस्थमा आहे, त्यांच्यासाठी कबुतरांचा संपर्क अधिक त्रासदायक ठरू शकतो.
फुफ्फुसाचे आजार: कबुतरांच्या विष्ठेतील ॲलर्जीमुळे अतिसंवेदनशीलता न्यूमोनिटिस (Hypersensitivity Pneumonitis) सारखे गंभीर फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज येते, श्वास घेण्यास त्रास होतो आणि दीर्घकाळ उपचार न मिळाल्यास फुफ्फुसांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.