Pneumonia Disease google
आरोग्य

Pneumonia Disease : या लोकांना असतो न्यूमोनियाचा सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे

रक्त आणि थुंकीच्या चाचण्यांसह या स्थितीचे निदान निश्चित करण्यासाठी छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅनची निवड करावी लागेल.

नमिता धुरी

मुंबई : न्यूमोनिया हे एक तीव्र श्वसन संक्रमण आहे जे सामान्यतः विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे होते. हे सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. जेव्हा ज्येष्ठ नागरिक, प्रौढ किंवा अगदी लहान मुलांचा विचार केला जातो तेव्हा ते देशातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

न्यूमोनिया हा मुख्यतः जिवाणू संसर्गामुळे होत असला तरी, बुरशीजन्य संसर्ग किंवा इन्फ्लूएंझा किंवा कोविड-19 सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे फुफ्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. याबाबत जाणून घेऊ या गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. प्रभाकर शेट्टी यांच्याकडून.

न्यूमोनियाची कारणे

आपल्या देशात क्षयरोग (टीबी) हे फुफ्फुसाच्या न्यूमोनियाचे सर्वात सामान्य कारण आहे. रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींना, तीव्र श्वासोच्छवासाची समस्या आहे जसे की क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) किंवा गंभीर कोविड संसर्ग झालेल्यांना न्यूमोनिया होऊ शकतो.

धूम्रपान, अल्कोहोलचा वापर आणि बेकायदेशीर औषधे देखील न्यूमोनियासाठी जोखीम घटक म्हणून योगदान देतात. इतर कारणे म्हणजे मुलांमध्ये पुरेशा पोषणाचा अभाव, घरात किंवा कामाच्या ठिकाणी प्रदुषुत हवा, एचआयव्ही, आणि अवयव प्रत्यारोपण किंवा स्वयंप्रतिकार विकारांसाठी स्टिरॉइड्स किंवा इतर इम्युनोसप्रेसंट औषधांचा वापर. हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

लक्षणे

ताप, थंडी वाजून येणे, भूक न लागणे, पिवळसर किंवा हिरव्या रंगाच्या थुंकीसह खोकला आणि दम लागणे ही न्यूमोनियाची काही सामान्य लक्षणे आहेत. वरील लक्षणे दिसल्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. या स्थितीकडे दुर्लक्ष करणे टाळणे आणि योग्य प्रकारचे उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहे.

निदान

रक्त आणि थुंकीच्या चाचण्यांसह या स्थितीचे निदान निश्चित करण्यासाठी छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅनची निवड करावी लागेल.

उपचार

या स्थितीवर मात करण्यासाठी प्रतिजैविक आणि सहायक काळजीच्या स्वरूपात असेल.

प्रतिबंध

इन्फ्लूएंझा आणि न्यूमोकोकल सारख्या लसी या स्थितीचा धोका कमी करू शकतात. म्हणून, लसीकरण टाळू नका. धूर, अल्कोहोल आणि मादक पदार्थांचा वापर टाळल्यास न्यूमोनियाचा धोका कमी होईल. जीवनावश्यक पोषक तत्वांचा समावेश असलेला सकस आहार घ्या, दररोज व्यायाम करा, मधुमेह नियंत्रित करा, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

SCROLL FOR NEXT